शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रूपये वर्षभरापासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 5:00 AM

वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. 

ठळक मुद्देसन २०२१ मध्ये ठोठावला २९ लाखांचा दंड : २८ लाखांचा दंड झाला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची बाब म्हणजे एखाद्या बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीची शिक्षा निरपराध व्यक्तीला भोगावी लागते. वाहतूक अपघातांतील बहुतांश प्रकरणांतील हीच स्थिती असते. यामुळेच वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. यातील १२६७५ कारवायांतील २७ लाख ५६ हजार ०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ५२५ कारवायांतील एक लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड अद्यापही संबंधितांवर थकून आहे. 

परवाना नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया - सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.- परवाना नसल्यास वाहतूक पोलिसांकडून जास्तीत जास्त १०० रुपयांचे चलन होत असल्याचा समज आजही कित्येक नागरिकांत आहे. त्यामुळे परवाना काढण्याची भानगड पाळण्यापेक्षा १०० रुपये दिलेले बरे अशा तोऱ्यात ते वागतात.

लवकर दंड न भरल्यास...- वाहतूक नियंत्रण शाखेने एखाद्या वाहनावर कारवाई केल्यानंतर त्याने दंडाची रक्कम कित्येक दिवस भरली नसली तरीही त्यावर व्याज लावता येत नही. आहे ती रक्कमच नियमानुसार घ्यावी लागते.- एखाद्या व्यक्तीने दंडात्मक कारवाई झाल्यावर पैसे न भरल्यास वाहतूक नियंत्रण शाखा दंडाची रक्कम वाढवू शकत नाही. यामुळेही कित्येकांकडून दंड थकविला जातो.- मात्र, दंडाची रक्कम थकवून असलेली व्यक्ती दुसऱ्यांदा वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्यास त्याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते व अशात वाहन जप्त केले जाते. जुनी रक्कम वसूल झाल्यावर ते वाहन सोडले जाते.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस