कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविल्यास शेतकºयांना सिंचन प्रकल्पांच्या मदतीने शेती करावी लागते. मागील दोन तीन वर्षांपासून निसर्गाने सतत दगा दिल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. यंदा देखील कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची भिस्त सिंचन प्रकल्पावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.खरीप आणि उन्हाळी पिकांसाठी शेतकºयांना पुजारीटोला व इटियाडोह या प्रकल्पाच्या उपकालव्यातून पाणी दिले जाते. बाघ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया, आमगाव व सालेकसा या तालुक्यांना तर इडियाडोह प्रकल्पातून जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, लगतच्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यांना पाणी दिले जाते.पुजारीटोला प्रकल्पातून १६५ गावांतील शेतकऱ्याना सिंचनासाठी पाणी दिले जाते. इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यातून १०९ गावातील शेतकरी शेती पिकवितात.शेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाते. यात, पुजारीटोला प्रकल्पासाठी अद्याप पाणी वापर संस्थांची स्थापना झाली नाही. त्यामुळे थेट सिंचन विभागातर्फे शेतकºयांना पाणी दिले जाते.इटियाडोह येथे ५५ पाणी वापर संस्था असल्याने त्यांच्यामार्फत पाणी दिले जाते. यात उन्हाळी शेती तर या प्रकल्पांतून दिल्या जाणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. ज्या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिके घेतात. त्याच पाण्याचे पैसे भरण्याकडे पाणी वापर संस्थाचे दुर्लक्ष झाले आहे.पुजारीटोला व इटियाडोह या दोन्ही प्रकल्पांच्या पाण्यावर शेती करणाऱ्या २७४ गावांतील पाणी वापर संस्था आणि शेतकºयांकडे पाणी पट्टीची १७ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यामुळे ५० टक्के सुटशेतकºयांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर सिंचन विभागाकडून दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने या दरातही सुट दिली जात आहे. त्यानंतर इटियाडोह प्रकल्पाकडून खरिपात २० हजार रूपये दलघमी तर उन्हाळीसाठी ८० हजार रूपये दलघमी असे दर आकारले जात आहे. तर बाघ प्रकल्पाकडून खरिपात २४० रूपये हेक्टरी व उन्हाळीत ७२० रूपये हेक्टरी आकारले जात आहे. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून या दरात शेतकऱ्याना ५० टक्के सुट दिली जाते.प्रकल्पांच्या स्थापनेपासूनची थकबाकी२७४ गावांतील बहुतांश शेतकरी पाणी पट्टीचे थकबाकीदार असतानाच यातील बहुतांश पाणी वापर संस्था आणि शेतकरी या प्रकल्पांच्या स्थापनेपासूनचे थकबाकीदार असल्याचीही माहिती आहे. पुजारीटोला व इटियाडोह हे दोन्ही प्रकल्प सन १९७० च्या सुमारास तयार झाले आहेत. आता ४० वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटूनही कित्येक पाणी वापर संस्था आणि शेतकऱ्यांनी पाणी पट्टी भरलेली नसल्याची माहिती आहे.
पाणीपट्टीची १७ कोटी ५८ लाखांची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:35 PM
कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाºया पाण्याकरिता सिंचन विभागाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे वसूल केले जातात. मात्र मागील चाळीस वर्षांपासून जिल्ह्यातील २७४ गावांतील शेतकºयांकडे पाणीपट्टीचे १७ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयांची थकबाकी असल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान या थकबाकीमुळे सिंचन विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही ...
ठळक मुद्देसिंचन विभाग अडचणीत : चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष