तिरोडा : जिल्ह्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनचा दर दोन दिवसांनी तुटवडा निर्माण होत आहे. ही परिस्थिती बघता हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स खरेदी करून तत्काळ ऑक्सिजन पुरविण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी आपल्या स्थानिक निधीतून ६० लाख ८० हजार रुपये तातडीने मंजूर करून दिले.
आ. विजय रहांगडाले यांनी १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी दीपकुकमार मीना यांच्याशी चर्चा केली. तिरोडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ५ लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे ५० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स खरेदी करण्याकरिता आपल्या स्थानिक निधीतून ६० लाख हजार रुपये तातडीने मंजूर करून दिले. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सद्वारे रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबतच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.