शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पं.स.च्या लिपिकाने केली ६३.३८ लाखांची अफरातफर

By admin | Published: February 25, 2016 1:41 AM

सडक-अर्जुनी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाने १७ जानेवारी २०१२ ते ८ जानेवारी २०१६ या काळात ....

चौकशी सुरू : सडक अर्जुनीतील प्रकारसडक अर्जुनी : सडक-अर्जुनी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाने १७ जानेवारी २०१२ ते ८ जानेवारी २०१६ या काळात ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपयांची अफरातफर केल्याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गोंदिया तालुक्याच्या चारगाव (रावणवाडी) येथील सुनील गोंदुलाल पटले (४०) असे त्या लिपिकाचे नाव आहे. पटले सडक-अर्जुनी येथील पंचायत समितीत कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. त्याने सडक-अर्जुनी येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या वेगवेगळ्या तीन खात्यातील ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपये काढून त्यांची अफरातफर केली. २०१२-१३ मध्ये गटशिक्षणाधिकारी सोयाम होते. त्यानंतर खोब्रागडेंकडे चार्ज होता आणि सध्या मोरेश्वर मेश्राम हे गटशिक्षणाधिकारी आहेत. खाते क्र.२०३/६० यामधून ४७ लाख ३३ हजार ७४५ रूपये, खंडविकास अधिकारी यांचे खाते क्र.२०४/०१ मधून १५ लाख ७३ हजार ४८७ तर खाते क्र. २०४/०४ या खात्यातून ३१ हजार ५०० रूपये असे एकूण ६३ लाख ३८ हजार ७३२ रूपये हडप केल्याचा पटलेवर आरोप आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी चौकशी केली. या प्रकरणात पटले याने अपहार केल्याची बाब लक्षात येताच गटशिक्षणाधिकारी मुनेश्वर मेश्राम (४७) रा.शास्त्री वॉर्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कनिष्ठ लिपिक पटले सध्या फरार असल्याचे सांगितले जाते.पोषण आहारातील निधी स्वत:च्या खात्यातगटशिक्षणाधिकारी मोरेश्वर मेश्राम यांनी पाच लाख रुपयाच्या धनादेशवर सही केली होती. तो निधी जि.प. शाळेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा होता. तसेच स्वयंपाकाकरिता लागणारा भाजीपाला घ्यायचा होता. स्वयंपाकीण महिलांचे मानधन न देता आणि भाजीपाल्याचा निधी संबंधितांना न देता लिपीक सुनील पटले याने आपल्या खात्यात वळता कसा केला याचीही चौकशी जिल्हा परिषद गोंदिया येथील चौकशी समिती करीत आहे.