शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

जनधनचे पैसे परत जाणार अफवेने बँकेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोरगरिबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शासनस्तरावर महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा करण्यात आले. परंतु कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार म्हणून मंगळवारी (दि.७) महिलांनी बँकेत एकच गर्दी केली होती. यामुळे बँक कर्मचारी आणि पोलिसांची सुध्दा चांगलीच दमछाक झाली.लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यातंर्गत एप्रिल महिन्याची रक्कम बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. खातेदारांची गर्दी टाळण्यासाठी बँकेच्या वेळापत्रकानुसार खातेदारांना रक्कम काढता येईल. बँकेत गर्दी करू नये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. अशातच ५ व ६ एप्रिलला सुट्टी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. याच दरम्यान कुणीतरी अफवा पसरविली की जनधन खात्यातील रक्कम परत जाणार आहे. या अफवेने बँक परिसरात गर्दी उसळली होती. तसेच कुणी संजय गांधी निराधार योजनेचे, तर कुणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी मंगळवारी बँकेत गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. भर उन्हात पैसे परत जाणार या अफवेने गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहयला मिळाले. गर्दी नियंत्रीत करण्यासाठी बँक कर्मचारी व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. भारतीय स्टेट बँकचे प्रभारी व्यवस्थापक चंद्रशेखर सुखदेवे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक एस.बी.बोरकर यांनी सांगितले जनधन योजनेच्या लाभार्थ्यांनी अफवांना बळी पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जनधन योजनेतील ज्यांचा खात्यावर जमा झालेली रक्कम त्यांना मिळेल असे लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना