ऑनलाईन लोकमतगोंदिया : स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत गोंदिया शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी सोमवारी (दि.२६) केंद्रीय समिती येत आहे. ही समिती शहराचे सर्वेक्षण करणार व त्यानुसारच गोंदिया शहराला रँकिंग दिले जाणार आहे. त्यामुळे या समितीला खूश करण्यासाठी नगर परिषदेची धावपळ सुरू झाली आहे. कधी नव्हे ते स्वच्छतेचे काम आता केले जात आहेत. समितीला दाखविण्यासाठी सुरू असलेली धावपळ बघून शहरवासी ‘सब जानते है’ अशाच प्रतिक्रीया उमटत आहेत.मागील वर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत गोंदिया ३४३ व्या क्र मांकावर होता. यातून गोंदिया नगर परिषदेच्या कामकाजाची अनुभूती येते. मागील वर्षीच्या अनुभवानंतरही नगर परिषद स्वच्छता विभागाच्या कामात काहीच बदल झाला नाही. वर्ष भर होती तीच स्थिती असताना आता समिती येणार असल्याने शहर चकाचक करण्यासाठी नगर परिषद यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रीला कधी नव्हे ती आता ऐनवेळी सफाई केली जात आहे. कचरा टाकण्यासाठी डस्टबीन नव्हते ते आता लावले जात आहेत. शहरात रिक्शा फिरत असून स्वच्छतेचे मंत्र देत आहे. तर समिती येणार असल्याने आता कचराकुंड्या तयार केल्या जात आहेत.समितीचा धसका घेत नगर परिषद कार्यालयातील शौचालयांत शनिवारी (दि.२४) टाईल्स लावण्यात आल्या.तसेच दारांना पेंट लावण्यात आल्याचेही दिसले. कसेही करून समिती खुश व्हावी व चांगले रँकींग करून जावे हा या मागचा हेतू असून याबाबत शहरवासी बोलत आहेत. बघावे तर शहरवासीयांच्या प्रतिक्रीयांत तथ्य असून समिती येणार असल्यानेच नगर परिषद यंत्रणा आता कामाला लागली आहे. अन्यथा नगर परिषद यंत्रणा स्वच्छतेला घेऊन एवढी गंभीर कधी दिसलीच नाही हे ही तेवढेच खरे आहे.वरिष्ठ अधिकारी नजर ठेवूनस्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन नगर विकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे बुधवारी (दि.२१) गोंदियात आले होते. या दौºयात त्यांनी शहरात विविध परिसरात जावून स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र शहरातील स्थिती बघून ते खुश नसल्याने कळले. यामुळेच त्यांनी प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर व सहायक प्रादेशिक उप संचालक कैलाश झवल यांना गोंदियात पाठविल्याची माहिती मिळाली. हे दोघे वरिष्ठ अधिकारी गुरूवारपासून गोंदियात असून ते स्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन जातीने नजर ठेवून आहेत. यांतर्गत ते नगर परिषद यंत्रणेला आवश्यक त्या सुचना देऊन मार्गदर्शन करीत असल्याचीही माहिती आहे.सकाळपासूनच कचºयाची उचलएरवी दिवसेंदिवस पडून असलेला कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेचे ट्रॅक्टर फिरकत नव्हते. मात्र रविवारी सकाळीच ट्रॅक्टर कचरा उचलण्यासाठी शहरात फिरत असताना दिसले. यात सफाई कर्मचारी सुका कचरा जागीच जाळून त्याची विल्हेवाट लावत होते. तर ओला किंवा अन्य कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकून नेत असल्याचे बघावयास मिळाले. वर्ष भर याच प्रकारे काम झाले असते तर नगर परिषद यंत्रणेची अशी धावपळ झाली नसती. ते काही असो, मात्र समितीच्या आगमनामुळे होत असलेली कामे बघून तरी सफाई होत असल्याने शहरवासी समाधान व्यक्त करीत आहेत.नगरपरिषदेचे कामकाज हिंदीतूननगर परिषदेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता विषयक कामांची माहिती देण्यासाठी नगर परिषदेने प्रसिद्ध पत्र काढले. मात्र हे प्रसिद्धी पत्र हिंदी भाषेत आहे. यामुळे महाराष्ट्रात असलेल्या गोंदिया नगर परिषदेचा कारभार हिंदीतूनच सुरू असल्याचे दिसून येत आहे. मराठी भाषेतून सर्व कागदोपत्री व्यवहार करावयाचा असताना हिंदीतून हे प्रसिद्धी पत्र काढण्यात आल्याने नगर परिषद कामकाजाची यातून प्रचीती येते.पावला-पावलांवर होर्डिंग्जस्वच्छता सर्वेक्षणाला घेऊन शहरात प्रत्येकच भागात सध्या होर्डिंग्ज वॉर सुरू आहे. पावला-पावलांवर नगर परिषद स्वच्छतेचे मंत्र देणारे होर्डिंग्ज लावून जनजागृती करीत आहे. यासाठी मध्यंतरी सिने कलावंत व क्रिकेटपटूंचाही आधार घेण्यात आल्याचे दिसले. फक्त होर्डिंग्ज लावून जनजागृती झाली असती तर विषयच नव्हता. निकषांच्या आधारे हे सर्व केले जात असल्याचे नगर परिषद अधिकारी सांगतात. शहरात आता किती होर्डिंग्ज लावण्यात आले याबाबत खुद्द नगर परिषद अधिकारीही जाणत नाहीत. मात्र याचा सर्व खर्च नगर परिषदेच्या तिजोरीवर येणार आहे.
समितीला खूश करण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 9:17 PM
स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत गोंदिया शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी सोमवारी (दि.२६) केंद्रीय समिती येत आहे. ही समिती शहराचे सर्वेक्षण करणार व त्यानुसारच गोंदिया शहराला रँकिंग दिले जाणार आहे.
ठळक मुद्देऐनवेळी स्वच्छतेची आठवण : शहरवासी ‘सब जानते है’ च्या प्रतिक्रिया, आता होत आहे कचरापेट्यांचे बांधकाम