लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील नागरिकांना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी नाव लौकिक करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अधोगतीला जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या विविध योजनांतून रुग्णेसेवेसाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी. यासाठी शासनाने तालुकास्थानी ग्रामीण रुग्णालयाची सेवा कार्यान्वित केली आहे. या रुग्णालयातून राज्य सिमेवर असलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील नागरिकांना रुग्णसेवा देण्यासाठी या रुग्णालयाचे कार्य गतिमान आहेत.या रुग्णालयात २०१६-२०१७ या सत्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभना सिंह रुजू झाल्या. त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह रुग्णालयातील सेवा तत्पर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णालयातील स्वच्छतेपासून तर आरोग्य सेवाही गतीमान केली. त्यामुळे प्रसुती व कुटुंब नियोजनात निरंक असलेल्या रुग्णालयात या सेवा कार्यरत करण्यात आल्या. त्यांच्या स्वच्छ व योग्य सेवा देण्याच्या कामगिरीची नागरिक व प्रशासनाने योग्य दखल घेतली होती. परंतु पुढे त्यांच्या पदाच्या राजीनाम्याने रुग्णालयाची अवस्था अधोगतीला गेल्याचे चित्र आहे.रुग्णालयातील सन २०१६-१७ मधील ओपीडी ३६ हजार ४२०, आकस्मिक रुग्णसेवा दोन हजार ७७९, आंतररुग्ण विभागातील सेवा एक हजार २३८, प्रसुती २९ तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया १७ करण्यात आल्या होत्या. यात रुग्ण सेवा गतीमान ठरुन २०१७-१८ मध्ये रुग्णांची तपासणी ओपीडी ४२ हजार ९८, आकस्मिक रुग्णसेवा तीन हजार ८६४, आंतररुग्ण सेवा एक हजार २८७, प्रसुती ९५ व कुटुंब शस्त्रक्रिया ५८ करण्यात आल्या.रुग्णसेवेसाठी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी सतत प्रयत्न करत असताना रुग्णालयात विविध विभागांची सेवा तत्काळ मिळावी यासाठी कर्तव्यावर असतात. परंतु प्रशासनाच्या वक्रकृष्टीने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे निदर्शनात येत आहे. रुग्णालयात अवघ्या आठ महिन्यांत दोन वैद्यकीय अधिकारी पद सोडून गेले.त्यामुळे या रुग्णालयातील सेवा प्रभावित होत आहे.रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांचे पद सदैव रिक्त स्थितीत आहे. तर वैद्यकीय अधिकाºयांची तीन पदे अद्यापही भरण्यात आली नाही. अधिकाºयांची सात पदे मंजूर असून त्यापैकी तीन पद रिक्त आहेत. रुग्णालयातील स्वच्छता दुताचे एक पद रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी दिनेश गिऱ्हेपुंजे यांचा करार संपत असल्याने जून महिन्यात त्यांचे पद रिक्त होणार आहे. त्यामुळे परत बदलीसह आयुष विभागातील डॉक्टरांवर या रुग्णालयाची जबाबदारी वाढणार आहे.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. या रुग्णालयात एप्रिल महिन्यातच दोन हजार ४६१ रुग्ण तपासणी, आकस्मिक रुग्ण ३६०, आंतररुग्ण विभाग सेवा ७८ वाढत्या स्वरुपात आहेत. यात सेवा देण्यासाठी रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त असल्यामुळे विविध आजारांचे नमुणे तपासणीकरीता रुग्णालयात सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना जास्त रक्कम मोजून खाजगी प्रयोगशाळेतून नमुने तपासनी अहवाल आणावा लागतो. सद्या स्थितीत मलेरियाची किटसुद्धा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन खर्च करुन तपासणी करावी लागत असल्याची बाब पुढे आली.
ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अधोगतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:43 AM
तालुक्यातील नागरिकांना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी नाव लौकिक करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अधोगतीला जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या विविध योजनांतून रुग्णेसेवेसाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.
ठळक मुद्देरिक्त पदांमुळे रुग्ण सेवेवर परिणाम : प्रयोगशाळा तंत्रज्ञ अभावी तपासणी खासगी प्रयोगशाळेत