शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

लोकमतमधील कात्रणाने साकारले ‘आरोग्य वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:04 AM

कुणाला कुठल्या गोष्टीचा छंद असेल हे सांगता येत नाही. अनेक छंदवेड्यांमुळे बरेचदा जुन्या वस्तुंचे आणि माहितीचे जतन केल्या जात. पुढे हीच माहितीची शिदोरी अनेकांच्या उपयोगी व कठीण प्रसंगी मोलाची ठरते.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून केले माहितीचे संकलन : शिक्षक घनश्याम पटले यांचा उपक्रम

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कुणाला कुठल्या गोष्टीचा छंद असेल हे सांगता येत नाही. अनेक छंदवेड्यांमुळे बरेचदा जुन्या वस्तुंचे आणि माहितीचे जतन केल्या जात. पुढे हीच माहितीची शिदोरी अनेकांच्या उपयोगी व कठीण प्रसंगी मोलाची ठरते. अशाच एका छंद जपणाऱ्या शिक्षकांने मागील दहा वर्षांपासून लोकमत वृत्तपत्रातील आरोग्य विषयक सदराची कात्रणे जमा केली. ही आरोग्य विषयक माहिती सर्वांच्या उपयोगी पडावी. यासाठी त्यांनी या कात्रणांचे पुस्तक तयार करुन त्याला ‘आरोग्य वाचनालय’ हे नाव दिले. या पुस्तकाच्या माध्यमातून ते सर्वांना आरोग्याचा मंत्र जपण्याचा सल्ला देत आहे.घनश्याम देवचंद पटले असे त्या छंदवेड्या शिक्षकाचे नाव आहे. सालेकसा तालुक्यातील श्री तुकाराम हायस्कूल भोसा येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. लोकमत वर्तमानपत्र दररोज वाचन केल्यास प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रत्येक गोष्टीचे समाधान मिळते. जीवनातील वेग-वेगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा समज बाळगणारे पटले यांनी आपल्या दैनंदिन जीवनात लोकमतची संस्कृती जपत एक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. घनश्याम पटले हे सुरुवातीपासूनच केवळ लोकमत वृत्तपत्राचे वाचक आहेत. त्यांनी इतर वर्तमानपत्राच्या तुलनेत लोकमत कितीतरी पटीने योग्य व संपूर्ण ज्ञानवर्धक वृत्तपत्र असल्याचे त्यांचे मत आहे. मागील दहा वर्षापासून पटले यांनी लोकमतच्या वेगवेगळ्या सदरातील माहितीची कात्रणे जमा करुन त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी करतानाच त्यातील महत्वाच्या माहितीच्या आधारे समाजातील लोकांच्या समस्या सुद्धा दूर करण्याचे कार्य करीत आहेत. नुकतेच त्यांनी लोकमतमधील हेल्थ लायब्ररी या सदराखाली डॉ.जय देशमुख यांच्या आरोग्य विषयक लेखाची कात्रणे एकत्रित करुन १०८ पानांचे पुस्तक तयार केले. या पुस्तकाला त्यांनी ‘आरोग्य वाचनालय’ असे नाव दिले.पुस्तकात जवळपास ९९ प्रकारच्या आजाराबद्दल माहिती संग्रहित केली. पुस्तकामध्ये त्या रोगाबद्दल निदान, लक्षणे उपचार आणि घ्यावयाची काळजी इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे गावात जर कोणाला एखादा आजार झाला तर त्या आजारावर कोणता उपाय करता येईल याची माहिती पुस्तकाच्या मदतीने सहज मिळणे शक्य असल्याचे पटले यांनी सांगितले.हेल्थ लायब्ररी शिवाय पटले यांनी लोकमतमधील संपादकीय, शब्दकोडे, धर्म अध्यात्म, बोधकथा, जंगल संपत्ती, संस्काराचे मोती उपक्रमा अंतर्गत प्रकाशित होणारे सर्व कालम तथा ज्ञानवर्धक समकथा वस्तुंची माहिती असणाºया लेखांची हजारो कात्रणे त्यांनी संग्रहित केली आहे. या कात्रणाचा उपयोग करुन आपल्या अध्यापनात व शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे कार्य पटले करीत आहेत. दररोज कात्रणे संग्रहित करीत असल्याने केव्हाही त्यांना विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू प्रश्नाला उत्तरे देणे सोपे जाते. वेगवेगळ्या विषयाशी निगडीत कात्रणांची यापुढे पुस्तके तयार करुन विद्यार्थ्यांना व लोकांना माहिती देण्यासाठी उपयोगात आणार असल्याचे पटले यांनी सांगितले.अनेक मान्यवरांनी केली प्रशंसाघनश्याम पटले यांनी तयार केलेले ‘आरोग्य वाचनालय’ हे पुस्तक सर्वांनाच उपयोगी पडणारे आहे. या लोकोपयोगी पुस्तकाचे नुकतेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते प्रकाशन केले. शिक्षक आमदार नागोराव गाणार यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रकाशन सोहळ्यात पटले यांचे कौतूक केले.तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व सीईओ डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी. निमगडे यांनी सुद्धा कौतूक केले आहे.अशी मिळाली प्रेरणाघनश्याम पटले यांचे मूळ गाव चिल्हाटी हे होय. काही वर्षांपूर्वी गावातील जवळपास ३०-३५ लोकांना अर्धांगवायूच्या आजाराने ग्रासले. तेव्हा ही बाब गावात चिंतेचा विषय ठरली होती. त्यात पटले यांचे वडील देवचंद पटले यांनाही अर्धांगवायूचा आजार झाला. या आजाराने गावातील काही लोक दगावले सुद्धा यामध्ये काही युवकांचा सुद्धा समोवश होता. पटले यांनी वडिलांवर विविध ठिकाणी औषधोपचार केले. याच दरम्यान त्यांनी लोकमतमध्ये प्रकाशीत होत असलेल्या हेल्थ लायब्ररी या सदराचे वाचन करण्यास सुरूवात केली. त्यात अर्धांगवायूच्या आजाराबद्दल माहिती शोधू लागले. दरम्यान त्यांनी दररोज विविध रोगांबद्दल माहिती वाचने सुरु केले. त्यांच्या लक्षात आले की अर्धांगवायूच्या आजारापेक्षाही आणखी काही भयंकर आजार आहेत. त्याबद्दल जागरुकता नसल्यास ते जीवघेणे ठरु शकतात. हीच बाब लक्षात घेत त्यांनी लोकमत मधील हेल्थ लायब्ररी या सदराची रोजची कात्रणे काढून संग्रहित केली. त्यानंतर त्याचे पुस्तक तयार करुन त्याला ‘आरोग्य वाचनालय’ असे नाव दिले. यात जवळपास प्रत्येक दुर्धर आजाराबद्दल माहिती संग्रहित झाली. ती लोकांसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत आहे.