शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

शहीद पोलीस शिपायांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

By admin | Published: June 04, 2017 12:53 AM

पोलीस दल हे देशातील लोकांच्या संरक्षणाचे काम करीत असून स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही.

दिलीप भुजबळ : शहीद शिपाई विजय भोयरच्या पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीस दल हे देशातील लोकांच्या संरक्षणाचे काम करीत असून स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. नक्षलवाद असो वा आतंकवाद माजविणाऱ्या अविवेकी बुध्दीचा वापर करु न समाजात दहशत पसरविणाऱ्या दहशतवाद्यांचा नेहमीच सामना करून आपल्या वीरतेचा समाजाला व राष्ट्राला परिचय करु न दिला आहे. नक्षल्यांशी सामना करताना शहीद झालेले विजय भोयर यांच्या वीरतेला मी सलाम करीत असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी केले.तिरोडा तालुक्यातील सेलोटपार येथे भोयर कुटूंब व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त वतीने शहीद शिपाई विजय भोयर यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भूजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, जि.प.माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, इलमे, माजी पं.स.सदस्य संजय किंदरले, लोकशाहीर मधुकर बांते, सेवानिवृत्त अभियंता डी.यू. रहांगडाले, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लीलाधर पातोडे, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव दुलीचंद बुध्दे व तुलसीदास झंझाड उपस्थित होते.३० मे २००५ रोजी सालेकसा तालुक्यातील बेवारटोला येथे नक्षल हल्ल्यात शहीद विजय भोयर यांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मृतीदिनी भोयर कुटुंबीय, ग्रामपंचायत सेलोटपार व ग्रामस्थांच्या सहभागातून शहीद विजय भोयर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विजय भोयर यांचा मरणानंतरही देशाला अभिमान आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेकांना मिळणार असल्याचे डॉ.भूजबळ यांनी सांगितले.आपल्या मार्गदर्शनात माजी आमदार दिलीप बन्सोड म्हणाले, पोलीस दलातील जवानांचे वीरमरण हे दुर्लक्षीत करु न चालणार नाही. पोलीस दलातील जवानसुध्दा आपलेच बंधू आहेत. नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विजय भोयर यांनी जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी, असा त्यांनी आदर्शबोध घेवून त्याच उमेदीने नक्षलवाद्यांशी लढले व प्राणाची आहूती दिली, असे ते म्हणाले.यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स. सभापती उषा किंदरले, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, निलिमा इलमे, माजी पं.स. सदस्य संजय किंदरले, लोकशाहीर मधुकर बांते, सेवानिवृत्त अभियंता डी.यू. रहांगडाले, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पातोडे, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव दुलीचंद बुध्दे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक दुलीचंद बुध्दे यांनी मांडले. संचालन सेलोटपारचे सरपंच रामेश्वर हलमारे यांनी केले. आभार राधेश्याम मते यांनी मानले. कार्यक्रमात सेलोटपार व परिसराच्या गावातील नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.