गोंदिया : युवा कोसरे कलार समाज जिल्हा संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.१८) गोविंदपूर येथील जिल्हा कार्यालयात कलार समाजाचे आराध्य दैवत राजराजेश्वर सहस्त्रबाहू अर्जुन यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कोसरे कलार समाज बांधव, भगिणी व युवावर्ग उपस्थित होता.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तिर्थराज उके होते. याप्रसंगी समाजाचे वरिष्ठ नागरिक झुम्मकलाल मेश्राम, कोषाध्यक्ष दिनेश फरकुंडे, योगशिक्षक विजयकुमार कावळे, जगन करेले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सहस्त्रबाहू अर्जुन यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. समाजबांधवांना मिठाई वादून जयंतीदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संपूर्ण कोसरे कलार समाजासह कलार समाजातील मरठे, जैन, डांगरे, सोनकर, सावजी, परदेशी क्षत्रिय, शिवहरे, जायस्वाल आदी पोटजातीतील समाजाबांधवांनी आपसी मतभेद बाजूला सारून उच्च-नीचपणाची भावना नष्ट करावी. एकत्रित व संघटित होऊन सर्वच क्षेत्रात प्रगती करावी. समाजातील विकसित समाजबांधवांनी अविकसित असणाऱ्या समाजवर्गीयांच्या सर्वांगिण विकासासाठी पुढे यावे व याकामी संस्थेला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. संचालन मुलचंद फरकुंडे यांनी केले. आभार परमेश्वर कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनींद्र मेश्राम, संतोष मेश्राम, गुड्डू उके, सतीश मेश्राम, संजय शेंडे, प्रफुल्ल उके, मनीष बन्सोड, टेकचंद लाडे, दिलीप करेले, रंजित पटले, चंदन काशिवार, वैभव फरकुंडे, अशोक मानकर, रोहित फरकुंडे, अंकित बन्सोड, गोपाल लांजेवार, मुकेश मानकर, गुड्डू मेश्राम, मनोज मेश्राम, रमेश मेश्राम आदी समाजबांधवांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
सहस्त्रबाहू अर्जुन जयंती साजरी
By admin | Published: November 19, 2015 2:25 AM