लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आता सडक अर्जुनी तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. सडक-अर्जुनीपासून अवघ्या चार किमी अंतरावर बकी गेट आहे. मागील एक वर्षापूर्वी या बकी गेटवरुन हजारो पर्यटक पर्यटनासाठी जात होते. मात्र वातानुकूलित खोलीत बसून विविध अटी व नियम लादणाºया अधिकाºयांमुळे मागील वर्षापासून बकी गेट बंद करण्यात आल्याचा फतवा काढण्यात आला.बकी गेट इतर गेटपेक्षा जास्त उत्पादन देणारा गेट म्हणून मोठा आहे. तालुक्यातील कोसबी गावाजवळील बकी गेटमधून पर्यटनासाठी आत जंगलात गेले तर पर्यटकांना तेलनभरी, जांभुळझरी, कालीमाटी, कुरण, मोर्नाझरी, बदबदाझरी, बोदराईझरी व झनकारगोंदी तलाव असे मोठे ठिकाण पहावयास मिळतात. बकी गेटच्या पुढे जाताना झलकारगोंदी तलाव आहे. या तलावाचे बाजूला झुडपे जंगल नसल्यामुळे वनातील प्राणी पाहून ओळखण्याची संधी उपलब्ध होते. झनकारगोंदी तलाव परिसरात सांबर, हरीण, बिबट, अस्वल, रानकुत्रे, वाघ, रानगवे, रानडुकरे, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने पहावयास मिळतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या तीन गावांचे पुनर्वसन सौंदड गावाजवळ श्रीरामनगर या नावाने करण्यात आले आहे. सदर तिन्ही गावांचे पुनर्वसन झाल्याने त्या ठिकाणच्या घरांचे व त्यांच्या शेतीचे सपाटीकरण करण्यात आले. त्या ठिकाणी गवताचे मोठे कुरण तयार झाल्याची चर्चा आहे. त्या पुनर्वसित जागेच्या परिसरात प्राण्यांना खाण्यासाठी चाºयाची मुबलक प्रमाणात सोय झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांच्या वाढीचे दुष्परिणाम व्याघ्रप्रकल्पाजवळील कोकणा-जमि., कनेरी, मनेरी, खोबा, कोसमघाट, बकी, मेंडकी, कोलारगाव, कोसबी आदी गावातील शेतकºयांवर होताना दिसत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या लगत शेतपिकांवर जास्त ताव मारतात. हाती आलेल्या पिकांची मोठीच नासाडी करतात. त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. बंदोबस्त न केल्यास गरीब शेतकºयांच्या हाती आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे.गेल्या वर्षी बकी गेट बंद ठेवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते खराब असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांना जाण्यासाठी त्रास होत असल्याची समस्या पुढे करुन बकी गेट बंद करण्यात आले होते. वनातील मोर्चा कुटी जवळील पूल नसल्यामुळे पर्यटकांना वाहणाºया नाल्याच्या पाण्यातून गाडी काढावी लागत होती. मोर्चा कुटी जवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. व्याघ्र प्रकल्पातील खडीकरणाच्या रस्त्यावर गिट्टी बाहेर निघाल्याची माहिती आहे. पण वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकाºयांनी मनावर घेतले तर दोन दिवसांत मुरमाचा लेप लावून पूर्ण करता येतो. पण कोणताही अधिकारी मनाला लावून घेत नाही, हे विशेष.गाईड्सवर बेरोजगारीची कुºहाडपर्यटकांच्या पर्यटनामुळे बकी गेट येथील नऊ गाईड परिवारांची आर्थिक समस्या दूर झाली होती. पण बकी गेट बंद असल्यामुळे या गाईड लोकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. पर्यटनासाठी येणाºया देवरी, गोंदिया, सडक-अर्जुनी, रायपूर, चिचगड, गोरेगाव आदी शहरांतील पर्यटकांना बकी गेट सोयीचे आहे. राष्टÑीय महामार्ग-६ वरुन जाणाºया पर्यटकांना बकी गेट फक्त तीन किमी अंतरावर आहे.कोहमारा येथील हॉटेल व्यवसाय ठप्पबकी गेट बंद असल्यामुळे आता या पर्यटकांना नवेगावबांधला २२ किमी अंतर जास्त जावून पर्यटकांना आनंद घ्यावा लागणार आहे. गेल्या वर्षी कोहमारा मार्गे बकी गेटला जाणाºया पर्यटकांमुळे कोहमारा येथील हॉटेलवाल्या व्यावसायिकांचे व्यवसाय चालत होते. आता एकही पर्यटक कोहमारा चौकात थांबत नाही. त्यामुळे कोहमारा येथील व्यावसायिकांचे धंदे चौपट झाले आहेत. वन्यजीव विभागाच्या आदेशाप्रमाणे दरवर्षी १ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी गेट सुरू केले जातात. पण अजूनपर्यंत यावर्षी बकी गेट सुरू झाले नाही. त्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पत्रावरून गेट सुरु होण्याचे पत्र येईल, याची खात्री नसल्याची माहिती पुढे आली आहे.बंद गेटसमोर शुल्क दर्शविणारा फलकबकी गेट जवळ वन्यजीव विभागाने प्रवेश शुल्काचा बोर्ड लावून ठेवला आहे. त्यात भारतीय नागरिक पुरुष ३० रुपये, स्त्री २० रुपये, ० ते १२ वर्षांची मुले-मुली नि:शुल्क, ५ ते १२ वर्षे मुले-मुली १५ रुपये प्रती व्यक्ती, कॅमेरा २५०, साधा कॅमेरा १०० रूपये तर वाहणांसाठी शुल्क चारचाकी, बस, ट्रक १५० रुपये, गाईडकरिता प्रती फेरी २५० रुपये असल्याची माहितीचा फलक लावला आहे. मागील वर्षी बकी गेट बंद राहिल्याने शासनाचा आर्थिक नुकसान झाला आहे. त्याच बरोबर पर्यटकांना त्रास होवून नवेगावबांधमार्गे फेºयाने पर्यटनासाठी जावे लागत आहे.वरिष्ठ अधिकाºयांचे गेट सुरु करण्यासंबंधी सूचना नसल्यामुळे बकी गेट बंद ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांची सूचना येताच बकी गेट सुरू केल्या जाईल.-प्रशांत पाटीलवनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव, नवेगावबांध
साहेब, बकी गेट सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:08 PM
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आता सडक अर्जुनी तालुक्यासाठी वरदान ठरला आहे. सडक-अर्जुनीपासून अवघ्या चार किमी अंतरावर बकी गेट आहे.
ठळक मुद्देवर्षभरापासून बंदच : सर्वाधिक उत्पन्न देणारा गेट, पर्यटकांना होते २२ किमीचा फेरा