लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विना परवाना खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कीटकनाशके व खताचा साठा जप्त केला.ही कारवाही बुधवारी सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथे करण्यात आली.सोनारटोला येथे रामकृष्ण शेंडे यांचे मे गीरजा कृषी केंद्र असून त्यांच्याकडे केवळ बियाणे विक्रीचा परवाना आहे. मात्र ते खते आणि कीटकनाशके सुध्दा विक्री करित असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाºयांना मिळाली. त्यांची शहानिशा करण्यासाठी बुधवारी त्यांनी सोनारटोला येथे त्यांच्या कृषी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.या दरम्यान त्यांच्या कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक औषधे आणि जैविक खताचा साठा आढळला. खते आणि कीटकनाशक विक्रीचा परवाना आहे का अशी विचारणा शेंडे यांना केली असता त्यांनी केवळ बियाणे विक्रीचा परवाना असल्याचे अधिकाºयांना सांगितले. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी खते आणि कीटकनाशकांचा जवळपास ३१ हजार ६२६ रुपयांचा साठा जप्त करुन सील ठोकले.तसेच याप्रकरणी रामकृष्ण शेंडे यांच्यावर रासायनिक खते नियंत्रण अधिनियम १९८५, कीटकनाशके १९६८ अन्वये विना परवाना रासायनिक खताची विक्री करणे, कीटकनाशक परवाना नसणे अधिनियम अंतर्गत सालेकसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी बाळासाहेब भगवान गिरी, तालुका कृषी अधिकारी एस.व्ही.भोसले, कृषी सहायक एस.टी.नागदीवे यांनी केली.
विना परवाना खते,कीटकनाशकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 11:51 PM
विना परवाना खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कीटकनाशके व खताचा साठा जप्त केला.ही कारवाही बुधवारी सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथे करण्यात आली.
ठळक मुद्देकृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई : सोनारटोला येथील घटना