देवरी : राज्याच्या सन २०२०-२१ या अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमगाव-देवरी या विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा या तिन्ही तालुक्यांतील २० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी निधीही उपलब्ध करून दिल्याने या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये सालेकसा तालुक्यातील आमगाव,लोहारा, फुक्कीमेटा, तिरखेडी, पुराडा ते सिरपूर या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता ९० लाख रुपयांचे निधी तर देवरी तालुक्यातील मरामजोब-मासुलकसा- सिंगनडोह-पालांदूर/जमी- मगरडोह- घोगरा व केशोरी या मार्गावर नवीन पूल बांधकामकरिता १ कोटी ५० लाख, भर्रेगाव- राजमडोंगरी- परसोडी व ककोडी या मार्गावर लहान पूल बांधकामाकरिता १ कोटी ५० लाख, भर्रेगाव- राजमडोंगरी-परसोडी व ककोडी या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता १ कोटी ५० लाख तर सालेकसा तालुक्यातील आमगाव (खुर्द) तिरखेडी-पुराडा व फुक्कीमेटा या मार्गावर रोड रुंदीकरण आणि डांबरीकरण करीता ५ कोटी रुपये, देवरी तालुक्यातील कोटजंभुरा-लटोरी-नवेगाव- सोनपुरी- लाभानधारणी व लोहारा या मार्गावरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण या कामाकरिता ४ कोटी रुपये, सालेकसा तालुक्यातील विचारपूर-गोर्रे- तिरखेडी या मार्गावरील रोड रुंदीकरण व डांबरीकरणकरिता ५० लाख रुपये, अड्याळ-दिघोरी- नवेगाव ते चिचगड या मार्गावरील रोड डांबरीकरणकरिता ३० लाख रुपये, काटोल- सावनेर-आमगाव-सालेकसा ते राज्य सीमेपर्यंतच्या मार्गावर रोड डांबरीकरणाकरिता २ कोटी रुपये, त्याचप्रमाणे, काटोल-सावनेर-आमगाव- सालेकसा ते राज्य सीमेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करण्याकरिता २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी अशा प्रकारे विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यांतील विविध विकास कामकरिता एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर कण्यात आला आहे. या विकास कामांना मंजुरी मिळवून देण्याकरिता आ.सहषराम कोरोटे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला.