गोंदिया : जिल्हा नियोजन समितीतून सन २०२०-२१ च्या जनसुविधा याेजनेतंर्गत गोंदिया विधानसभा क्षेत्रातील दीड कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना पालकमंत्री नवाब मलिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्ते आणि विविध विकास कामांची लवकरच सुरु केली जाणार आहे. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता.
जनसुविधा योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांमध्ये घिवारी-गर्रा जोड रस्ताचे सिमेंटीकरण, दतोरा येथील स्मशानभूमी रस्त्याचे सिमेंटीकरण, कुडवा ते अभियांत्रिकी महाविद्यालय व स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण, गिरोला स्मशानभूमी रस्त्याचे सिमेंटीकरण, आसोली-गोंडीटोला-पाटीलटोला येथे स्मशानभूमी शेड व बोअरवेल खोदकाम, कटंगी-टेमणी स्मशानभूमी रस्त्याचे सिमेंटीकरण, काटी-कन्हारटोला, डांगोर्ली अंर्तगत रस्ता सिमेंटीकरण, छिपिया, मुंडीपार, रावणवाडी, खातिया, बिरसी येथील रस्त्याचे सिमेंटीकरण, अदासी, निलागोंदी, बघाेली रस्ता सिमेंटीकरणाच्या कामाचा समावेश आहे. जनसुविधा योजनेतंर्गत या कामांना मंजुरी देण्यात यावी यासाठी माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी नयना गुंडे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी दिल्याबद्दल अग्रवाल यांनी त्यांचे आभार मानले आहे.