शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

पिपरी घाटावर रेती तस्करांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 1:56 AM

पिपरी ते सौंदडलगत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील अवैधरित्या गौणखनिज उत्खनन भरदिवसा गुप्त मार्गाने होत आहे.

लाखोंची रेती चोरी : नियम धाब्यावर बसविल्याने पुलाला धोका सौंदड : पिपरी ते सौंदडलगत असलेल्या चुलबंद नदी पात्रातील अवैधरित्या गौणखनिज उत्खनन भरदिवसा गुप्त मार्गाने होत आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व रेती माफियांचे लागेबांधे तर नाही, अशी चर्चा जोर धरत आहे. सौंदड ते पिपरी या मार्गावर दोन्ही गावांना जोडण्याकरीता शासनामार्फत पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या कारणाने पिपरी वाळूघाट, शासनाने ठरावामध्ये घेतले नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे रेती उत्खननाचे ठिकाण पुलापासून १ किमी अंतर इतके असणे बंधनकारक आहे. कारण नदीपात्रातील वाळू उपसा केल्याने खोली वाढेल व नदीपात्राची खोली वाढल्याने पुलाला धोका होण्याची शक्यता आहे. त्या कारणाने हा पिपरी घाट लिलावाकरीता घेण्यात आलेला नाही. पण रेती रात्री, दिवस या घाटावरून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केली जाते. दररोज जवळपास २० ते ३० ट्रॅक्टर्स रेती या घाटावरून अवैधरित्या लंपास केली जाते. कुठल्याही प्रकारचा परवाना नसून शासनाला लाखो रुपयांचा महसूल बुडीत जात आहे. उल्लेखनीय असे की, या सर्व प्रकाराला तालुक्यातील मोठ्या अधिकाऱ्यांचे अभय आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात धाड मारण्यापूर्वी अधिकाऱ्याच्या माध्यमातून रेती तस्करांना कळविले जाते. त्यामुळे थातूरमातूर कारवाई करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. मिलीजुली सरकार असा जनतेमध्ये गवगवा चालू आहे. तलाठ्यांच्या समोरून भर रेतीचे ट्रॅक्टर्स जातात पण त्याकडे लक्ष देण्याची वेळ मात्र अधिकाऱ्यांना मिळत नाही. गावकरी तलाठ्यांना फोन करून सांगतात, रेतीघाटावर ट्रॅक्टर्स रेती भरत असल्याचे माहिती देतात, पण आमच्या हातातले काम सोडून तेवढेच एक काम शासनाने आम्हाला द्यावे, आम्ही तेच एक काम करू, असे सांगून अधिकारी तक्रारींची दखल घेत नाही.(वार्ताहर)