लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तब्बल पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या परतीच्या पावसाने गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे दोन लाख हेक्टरमधील धानपिकांना संजीवनी मिळाली आहे. तर शेतकºयांवरील संकट सुध्दा काही प्रमाणात दूर झाले आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात धो धो बरसलेल्या पावसाने सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ब्रेक घेतला होता. बºयाच शेतकºयांची रोवणी आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आटोपली. मात्र यानंतर तब्बल पंधरा दिवस पाऊस न झाल्याने धानाच्या बांध्या कोरड्या पडल्या होत्या. तर तापमानात वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे हाती आलेले पीक गमावावे तर लागणार नाही ना, अशी चिंता शेतकºयांना सतावित होती. यावर्षी सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदा २ लाख हेक्टवर लागवड करण्यात आली. सध्या धान पोटरीवर असून या कालावधीत धानाला पावसाची गरज असते. त्यामुळे धानाची चांगली वाढ होवून उत्पादनात वाढ होत असते. मात्र पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. मागील दोन तिन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देत आहेत. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती चांगली नाही. उधार उसनवारी व बँकामधून कर्जाची उचल करुन शेतकºयांनी यंदा खरीप हंगामाची तयारी केली. त्यामुळे पावसाअभावी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड तर द्यावे लागणार नाही ना, अशी काळजी शेतकºयांना सतावित होती. पण गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने धानपिकांना संजीवनी मिळाली. तर शेतकºयांवरील संकट देखील टळले आहे.हवामान विभागाने पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे धानपिकांना संजीवनी मिळाली असून किडरोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होईल. जिल्ह्यात यंदा धानाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.
संकटातील पिकांना पावसामुळे संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:04 AM
तब्बल पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या परतीच्या पावसाने गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे दोन लाख हेक्टरमधील धानपिकांना संजीवनी मिळाली आहे.
ठळक मुद्देदोन लाख हेक्टरवर लागवड : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होणार