लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यावर्षी हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागले होते. वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेळेत आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने रोवणीची कामे खोळबंली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली होती. मात्र तब्बल महिनाभर पाऊस न झाल्याने केलेली रोवणी वाळत चालली होती. परिणामी मागील वर्षी सारखेच पुन्हा यंदाही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र बुधवारी आणि गुरूवारी (दि.१६) जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. तर सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धानासाठी अनुकुल मानला जातो. यंदा १८ आॅगस्टपर्यंत सरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही सरासरी समाधानकारक आहे. धान हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने यावरच या भागातील अर्थव्यवस्था अवंलबून आहे. मागील दोन तीन वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होतीे. मात्र तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर धरणातील पाणी साठ्यात थोड्याफार प्रमाणात वाढ झाल्याने त्याची शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
दोन दिवसाच्या पावसाने पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 9:33 PM
जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देसरासरी ७९८.९८ मि.मी.पावसाची नोंद : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी