अर्जुनी-मोरगाव : लोकमत सखी मंच अर्जुनी मोरगावतर्फे स्थानिक रुपचंदभाई प्रेमचंद पुगलिया कॉलेज नवेगावबांध येथे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी ममता पुगलिया होत्या. अतिथी म्हणून प्रीती दिनेश खोब्रागडे (प्रायोजक के. ब्रदर्स हार्डवेअर, नवेगावबांध), मंगला गडकरी, संयोजिका नंदिनी धकाते उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला देवी सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संचालन संतोष चांडक यांनी केले. आभार ममता भैया यांनी मानले. कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ यावर आधारित रांगोळी व पोस्टर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण निता लांजेवार व मंजू चांडक यांनी केले. तर पोस्टर स्पर्धेचे परीक्षण ममता भैया आणि नंदिनी धकाते यांनी केले. यावेळी नीता लांजेवार, मंजुषा तरोणे, रोहिणी कुंभारे, तृप्ती मेश्राम, पूनम मंत्री, सुनीता भय्या, प्रीती गोटेफोडे, प्रीती आकरे, संध्या मेश्राम, विद्या दिघरे, सुप्रिया टेकाडे उपस्थित होते. रांगोळी स्पर्धेत स्नेहल गजापुरे प्रथम तर जयश्री बाळबुध्दे द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. पोस्टर स्पर्धेत पूनम मंत्री प्रथम तर तृप्ती मेश्राम हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. विशेष आकर्षण म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर एक छोटीसी नाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी सपना उजवणे, अनिषा पठाण, संतोष चांडक, विभा जैन, समता पुगलिया, गीता गुप्ता, मंजू चांडक, नेहा परमार, नेहा परमार, उषा काशिवार, पूर्वा चांडक यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: December 09, 2015 2:15 AM