शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सरस्वती विद्यालयाचा जयंत जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 9:47 PM

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) जाहीर करण्यात आला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसरा आला असून जिल्ह्यातील ८९.३६ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी जयंत धर्माजी लोणारे याने सर्वाधिक ९७.६९ गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देविभागात जिल्हा दुसऱ्या स्थानी : ४५ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, विज्ञानाचा टक्का वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) जाहीर करण्यात आला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसरा आला असून जिल्ह्यातील ८९.३६ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी जयंत धर्माजी लोणारे याने सर्वाधिक ९७.६९ गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर याच विद्यालयाचा विद्यार्थी अभय देवराम चांदेवार याने ९७.०७ टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक व तृतीय क्रमांक पल्लवी ढोमणे हिने ९६.९२ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला.बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती.बारावीनंतर खºया अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीत जास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुध्दा वर्षभर मेहनत घेत असतात. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी १९ हजार १५१ विद्यार्थी उर्तीण झाले. निकालात यावर्षी सुध्दा जिल्ह्याने दुसरा स्थान कायम ठेवले आहे.बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३५५ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी १० हजार ११२ विद्यार्थी (९७.६५) उर्तीण झाले. तर कला शाखेचे एकूण ९ हजार ७२७ विद्यार्थी होते. त्यापैकी ७ हजार ८४९ विद्यार्थी (८०.६९) उर्तीण झाले.वाणिज्य शाखेचे एकूण ९०८ विद्यार्थी होते. यापैकी ८३९ विद्यार्थी (९२.४०) उर्तीण झाले. तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ४४१ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यापैकी ३५१ विद्यार्थी (७९.५९) उर्तीण झाले. विशेष म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.अर्जुनी मोरगाव तालुका सरसमागील दोन तीन वर्षांपासून बारावी निकालाच्या टक्केवारीत सुधारणा होत आहे. यात तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुका सरस ठरला आहे. अर्जुुनी मोरगाव तालुका ९३.५७ टक्के, गोंदिया तालुका ९०.२० टक्के, आमगाव तालुका ९०.४१ टक्के, देवरी ७९.५६ टक्के, गोरेगाव तालुका ९०.९८ टक्के, सडक अर्जुनी ८४.६५ टक्के, सालेकसा ९१.०३ टक्के, तिरोडा तालुका ८८.८१ टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारी सुधारणा झाल्याने जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसरे स्थान पटकाविले आहे.विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कलजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून निकालाची टक्केवारी सुध्दा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७.६५ टक्के, कला शाखेचा ८०.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.४० टक्के आणि व्होकेशनल शाखेचा ७९.५९ टक्के निकाल लागल आहे. यावरुन विज्ञान शाखेची टक्केवारी वाढत आहे.जिल्ह्यातील ४५ विद्यालयांनी गाठली शंभरीबारावीच्या निकालात जिल्ह्यातील ४५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक विद्यालय गोंदिया तालुक्यातील असून त्या पाठोपाठ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून ४५ विद्यालयांनी शंभर टक्के टक्केवारी गाठली आहे.येथेही सावित्रीच्या लेकी सरसबुधवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे येथेही सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ७०० विद्यार्थिनीनी परीक्षा दिली. त्यापैकी ९१.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.एकूण ९ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८७.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली. मुलींनी मिळविलेल्या गुणांचे प्रमाणही मुलांच्या तुलनेत सरस असल्याचे दिसून येते..१०० टक्के निकाल देणाºया जिल्ह्यातील शाळाविवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, गोंदियाजानकीदेवी चौरागडे कनिष्ठ महाविद्यालय कुडवा, गोंदियाप्रोग्रेसिव्ह उच्च माध्यमिक विद्यालय, गोंदियामातोश्री कनिष्ठ महाविद्यालय, कामठामनोहरभाई पटेल सैनिकी हायस्कूल, गोंदियाउमाबाई संग्रामे क. महाविद्यालय, नवेगावबांधश्री संत ज्ञानेश्वर कला कनिष्ठ विद्यालय, दतोराश्रीराम कनिष्ठ विद्यालय, खमारीजिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय, एकोडीजी.ई.एस.विज्ञान विद्यालय, कामठाविमलताई कनिष्ठ विद्यालय, कटंगीकलाजी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय, रावणवाडीजी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय,दासगावशासकीय पी.बी.आश्रमशाळा, मिरजापूरगुरूनानक हायस्कूल व क.विद्यालय, गोंदियाफुंडे कनिष्ठ विद्यालय, फुलचूरके.डी.भास्कर कनिष्ठ विद्यालय, डोंगरगावमात्रोश्री विज्ञान कनिष्ठ विद्यालय, नागराशंकरलाल अग्रवाल कनिष्ठ विद्यालय, बनाथरराजस्थान इंग्लीश हायस्कूल, गोंदियासाकेत ज्यूनीयर कॉलेज, गोंदियागणेशन ज्यूनीयर कॉलेज, गोंिदयालिटील फ्लावर्स, गोंदियासरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी-मोरगावजि.प.कनिष्ठ विद्यालय, अर्जुनी-मोरगावराजीव गांधी हायस्कूल, वडदनवोदय आटर्स कॉलेज, नवेगावबांधनूतन हिंदी हायस्कूल, अर्जुनी-मोरगावटी.डी.कनिष्ठ विद्यालय, येरंडीजे.एम.बी.कनिष्ठ विद्यालय, अर्जुनी-मोरगावनत्थूजी पुस्तोडे कनिष्ठ विद्यालय, देवरीप्रगती कनिष्ठ विद्यालय, परसटोलारामकृष्ण कनिष्ठ विद्यालय, कुऱ्हाडीएम.आय.पटेल हायस्कूल, सोनीसरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, घोटीवसंतराव कनिष्ठ विद्यालय, सडक-अर्जुनीसचिन लंजे कला विद्यालय, सडक-अर्जुनीशासकीय उच्च कनिष्ठ विद्यालय व आश्रमशाळा, जमाकुडो