लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ११०० मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने सुध्दा यंदा चांगला झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी १३०० मिमी पाऊस पडणे अपेक्षीत आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सरासरी जवळपास १३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी ७०० ते ८०० मिमी पाऊस पडला होता. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे सिंचन प्रकल्पातील सिंचन साठ्याने मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे. लागवड क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात सिंचन सुविधेच्या दृष्टीने ९ मध्यम प्रकल्प, २२ लघु प्रकल्प तर ४ मोघे धरण यांच्यासह गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे ३८ जुने मालगुजारी तलाव अस्तित्वात आहेत.यामध्ये बोदलकसा, रेगेपार, संग्रामपूर, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, रेंगेपार, मानागड, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे एकूण ९ मध्यम प्रकल्प तर आक्टीटोला, भदभद्या, डोंगरगाव, गुमडोह, हरी, कालीमाटी, मोगरा, नवेगावबांध, पिपरिया, पांगडी, रेहाडी, राजोली, रिसाला, सोनेगाव, सालेकसा, सडेपार, सेरपार, वडेगाव, जुनेवानी, उमरझरी, ओवारा, वारटोला अशी २२ लघु प्रकल्प आहेत.यंदाच्या खरीप हंगाम सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धरण, मध्यम व लघु प्रकल्पात २१ नोव्हेंबरपर्यंतचा विचार करता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ६७.८८ टक्के साठा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. तर मागील वर्षी याच तारखेला फक्त २८.०८ टक्के साठा उपलब्ध होता.लघु प्रकल्पात ७७.८४ टक्के जलसाठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ २९.६३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जुन्या मालगुजारी तलावातील जलसाठ्यात सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येते. जुन्या मालगुजारी तलावात यंदा ६९.३१ टक्के साठा उपलब्ध असून मागील वर्षी केवळ ३३.३३ टक्के साठा उपलब्ध होता.धरणातील जलसाठ्यातही वाढजिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.लघुप्रकल्पांमध्ये मुबलक पाणीएकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व मालगुजारी तलावातील पाण्याची टक्केवारी लक्षात घेता ७२ एवढी होती.तर मागील वर्षी केवळ २९.३१ टक्के एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांना निश्चितच फायदा मिळणार असल्याचे दिसून येते.
सिंचन प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 6:00 AM
जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धरणात ६१.०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
ठळक मुद्देलागवड क्षेत्रातही होणार वाढ : रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा