लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :समाज प्रबोधनाचे खरे कार्य आणि हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांनी त्यांच्या प्रबोधनातून केले. त्यांच्या प्रबोधनामुळे व्यसनमुक्तीची चळवळ बळकट करण्यास मदत झाली. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांना देण्यात या वेळी ते बोलत होते. संतांचा समतेचा व बंधुत्वाचा संदेश गावोगावी पोहोचिवला जावा. व्यसनमुक्त समाज आणि समतेचा संदेश घेवून सत्यपाल महाराज काम करीत आहे. संत चोखोबांच्या नावाने हा पुरस्कार राज्यात पहिल्यांदाच देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. संत चोखोबांच्या मंगळवेढा या निर्वाणभूमीत त्यांचे चांगले स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५१ हजार रु पयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवणीकर, प्रशांत ठाकरे व महादेवबुवा शहाबाजकर यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन होताच वारकरी फेटा, घोंगडी व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले.
गोंदियात सत्यपाल महाराजांचा संत चोखामेळा पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:23 PM
समाज प्रबोधनाचे खरे कार्य आणि हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे काम सप्त खंजीरी वादक सत्यपाल महाराज यांनी त्यांच्या प्रबोधनातून केले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
ठळक मुद्देसत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाने हजारो नागरिक व्यसनमुक्त