लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : भारत सरकार व वर्ल्ड कराटे फेडरेशनद्वारे मान्यताप्राप्त कराटे असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे स्पर्धेत सहभागी झालेल्या तिरोडा येथील संगम बावणकर याने ब्युडोकॉन कप २०१७ दुबई येथील इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये २१ ते २५ वयोगटामधील काता व कुमिते या स्पर्धेकरिता नेपाळच्या स्पर्धकाशी फायनलमध्ये झुंज देत दोन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्याचाच नव्हे तर भारताला सन्मान मिळवून देणारा संगम बावणकर हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याला तेसिंह अलोत, जिल्हा सेक्रेटरी, अम्युचल शोलोकॉन, कराटे असोसिएशन गोंदिया तसेच हेमंत चौके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय रामेंद्र बावणकर याला सुध्दा २७ ते ३० वयोगटात सुवर्ण पदक प्राप्त झाले असून दोघांचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संगम याने आपल्या यशाचे श्रेय आपली आई वंदना बावणकर व भाऊ सागर बावणकर यांना दिले आहे. त्याच्या यशाबद्दल आ. विजय रहांगडाले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, नगर सेवक राजेश गुणेरिया, अशोक असाटी, रमेशचंद्र झरारीया, जुगलकिशोर लढ्ढा, संजीव कोलते, दीपक जायस्वाल, प्रा. नरेंद्र पोतदार, प्रा. प्रशांत खांबरे, प्रा. सुनील इंगळे, प्रा. सुनील मानकर, प्रा.एम.डी. सहारे आदींनी कौतुक केले.
कराटे स्पर्धेत बावणकरला दोन सुवर्ण पदके
By admin | Published: May 30, 2017 1:00 AM