शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मुलांना व्यसनाधीतेपासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:27 AM

गोंदिया : सातव्या वर्गापासूनच्या मुलांमध्ये विविध प्रकारची व्यसनाधीनता आढळते. गुटखा, खर्रा, तंबाखू, विडी, सिगारेट व गांजा यांचे व्यसन जडते. ...

गोंदिया : सातव्या वर्गापासूनच्या मुलांमध्ये विविध प्रकारची व्यसनाधीनता आढळते. गुटखा, खर्रा, तंबाखू, विडी, सिगारेट व गांजा यांचे व्यसन जडते. लहानशी सवय पुढे व्यसन कधी होते हे कळतच नाही. एकदा व्यसन जडले की त्यापासून मुक्त होणे अत्यंत कठीण असते. जर पुढील पिढी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी, सशक्त व बुद्धिवान हवी असेल तर आजच्या मुलांना या व्यसनाधीनतेपासून वाचविणे अत्यंत आवश्यक आहे.

एकूण ५५ प्रकारच्या अमली पदार्थांचे व्यसन केले जाते. यात भांग, चरस, गांजा, अफू, हशिस, मारिजुआन मार्फीन, हेरॉईन, ब्राऊन सुगर, गर्ग, कोकीन, एलएसडी आदी प्रमुख अमली पदार्थ आहेत. तर पालीची शेपटी व झुरळ वाळवून त्यांची भुकटी करून सिगार ओढण्याचे प्रकार गावठी नशाखोरीत आढळतात. एवढेच नव्हे तर सोल्युशन रुमालावर लावून त्याचा गंधाचा नशा किंवा आयोडेक्स ब्रेडला लावूनही नशेतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यसनींचीही काही कमी नाही.

जिल्ह्यात प्रामुख्याने तंबाखू, खर्रा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू व गांजा यांची नशा करणारे आढळतात. गोंदिया शहराची लोकसंख्या सुमारे एक लाख ४४ हजार एवढी असून यापैकी ९५ टक्के लोक कसली ना कसली तरी नशा करतात. तर ९५ टक्क्यांपैकी ३ टक्के लोक पूर्णत: व्यसनाधीन आहेत. त्यांचे व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घ्यावा लागतो. शहरात पानविक्रीपेक्षा खर्राविक्री अधिक होत आहे. खर्रा तयार करणाऱ्या मशीन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. छत्तीसगड व मध्यप्रदेशात गांजा नशाखोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथील व्यसनाधीन व्यक्तींना येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणले जाते.

----------------------

व्यसन सोडविण्यासाठी ३ महिन्यांची थेरपी

दारुड्यांचे व्यसन सोडविण्यासाठी ३ महिन्यांची थेरपी आहे. यात १ महिना उपचाराचा तर २ महिने बाह्य वातावरणात ठेवून निरीक्षण केले जाते. जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य बाहेकर व्यसनमुक्ती केंद्रात दारुड्यांचे व्यसन सोडविण्यासाठी ३५ दिवसांचा उपचार कालावधी आहे. यात औषधोपचाराचा १ महिना तर ५ दिवस फीडबॅकचे आहेत. सुरुवातीला व्यसनी व्यक्तीला ७२ तासांपर्यंत सलाईनवर ठेवून इंजेक्शन दिले जातात. यानंतर जेवणात पातळ पदार्थ दिले जातात. त्यानंतर त्याची तलफ वाढत जाते, डोळे जळजळ करतात, खूप घाम येतो. नंतर त्याचे यकृत चांगले करण्यासाठी बीकासुल्स, लिव्ह-५२, असिलॉग आदी औषध दिली जाते. दररोज २ तास समुपदेशन, योग व प्राणायामाचे धडे सहानुभूतीने दिले जातात. शेवटी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितले जाते. दरम्यान, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नातलगांकडून मागविली जाते. त्यानुसार हळूहळू व्यसन सोडविले जाते.

------------------------------

मुली व महिलांनाही जडले व्यसन

जिल्ह्यातील काही महिलांनासुद्धा तंबाखू, खर्रा व दारूचे व्यसन जडल्याचे दिसून येते. काही महिला दारूचे सेवन करतात तर काही खरेदी करून घरी नेऊन सेवन करतात. सालेकसा, रावणवाडी व आमगाव येथेही हा प्रकार आढळतो. तसेच गोंदिया शहरातील शिक्षित मुलींमध्येही व्यसनाधीनतेचे प्रमाण आढळून येत आहे. शहरातील मोठ्या पुलावर काही शिक्षित मुली व मुलांचा घोळका सिगार ओढताना आढळतो. या समस्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच गोंदिया रेल्वेस्थानकावरही काही बालके भीक मागून किंवा बोगी साफ करून पैसे गोळा करून सोल्युशन खरेदी करतात व त्याची नशा करून फलाटावर किंवा ट्रेनच्या बोगीत पडून असलेले आढळतात.

----------------------------

अनुकरण, संगत व तणावातून नशाखोरी

लहान मुले आपल्या आई-वडिलांचे किंवा कौटुंबिक परिसरातील लोकांचे अनुकरण करतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनी असेल तर कुतूहलापोटी मुलेसुद्धा ते व्यसन करून पाहतात. परिणामी ती सवय होऊन व्यसन जडते. किशोरवयीन मुले संगतीमुळे व्यसनांच्या आहारी जातात. एखाद्या सोबत्याला एखादे व्यसन असले की कमी प्रमाणात इतर सोबतीसुद्धा ते सेवन करतात. त्यामुळे सवय जडते व व्यसन बनते. काही युवा व इतर वयाच्या लोकांना घरगुती, व्यावसायिक किंवा नोकरीविषयक ताण असते. एकदा नशा केल्याने त्यांना ताण कमी झाल्याचे वाटते. त्यामुळे नशा केली की ताण राहत नाही, अशी त्यांची धारणा बनते. त्यातच त्यांना दारूचे किंवा इतर व्यसन जडतात.

कोट

‘व्यसन सोडण्याची सर्वप्रथम मनात प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आत्मनियंत्रणातून मनाला कंट्रोल करून व्यसनी स्वत:च स्वत:चे व्यसन हळूहळू सोडवू शकतो. मात्र मनावर ताबा नसेल तर त्याला व्यसनमुक्ती केंद्राची गरज पडते. यात त्याला समुपदेशन, औषधोपचार, योग व प्राणायाम शिकवून व्यसनमुक्त होण्यासाठी मदत केली जाते. व्यसनमुक्त झालेला मात्र ४ वर्षांनंतर एकदा जरी त्याने व्यसन केले की त्याची स्थिती पूर्वीप्रमाणेच होते. त्यामुळे पुन्हा व्यसन जडू नये यासाठी त्याने व्यसनमुक्त होताच ‘अल्कोहोलिक अनॉनिमस ग्रुप’ जाॅईन करावे. या ग्रुपच्या गोंदियात दररोज बैठका होतात. त्यात मी दारुडा आहे, ही गोष्ट स्वीकार करावी लागते. त्याला आपल्या जीवनातील घटना बोलून दाखवाव्या लागतात. यात आज मी व्यसन केले नाही, असा भाव निर्माण होतो. दररोज याच भावात जगावे लागते. १० वर्षांनंतरही मी व्यसन केले नाही, असा भाव निर्माण होऊन पूर्ण आयुष्य तो व्यसनमुक्त जीवन जगतो.’

-विजय बहेकार,

बहेकार व्यसनमुक्ती केंद्र, गोंदिया.