शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

लटोरीची योजना वाचवा

By admin | Published: May 15, 2017 12:16 AM

सालेकसा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण जनतेला शुद्ध: पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्याकरीता कोट्यवधीचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली

जगदीश शर्मा यांची आर्त हाक : जिल्हा परिषदेला हस्तांतरित झालीच नाही लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : सालेकसा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण जनतेला शुद्ध: पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्याकरीता कोट्यवधीचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली लटोरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वाचवा अशी आर्त हाक अखिल भारतीय ग्राहक पंचायत आमगावचे संगठन मंत्री जगदीश शर्मा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव यांना केली आहे. सालेकसा तालुक्यातील लटोरी, आमगाव खुर्द, मुंडीपार, कोटरा, बाम्हणी, रोंढा, गोर्रे, बिजेपार, दरबडा, धानोली, नान्हवा, गिरोला, खोलगड, बिंजली, तिरखेडी, झालिया, कावराबांध, नवेगाव, कोटजंभूरा, लोहारा या गावाना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या उद्देशाने युती सरकारने बनगाव आणि लटोरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. तत्कालीन सरकार मधील वित्त आणि नियोजन मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून पुढील देखभाल दुरूस्ती करीता द्यावे, असे शासनाचे धोरण होते. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाली परंतु लटोरी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अद्याप जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाली नाही. परिणामी या योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्रातील साहित्याचे नुकसान होत आहे. सदर योजनेला वाचविण्यात यावे अशी, मागणी शर्मा यांनी केली आहे.