लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश अभियोग्यता चाचणी नीट परीक्षेत गोंदिया जिल्ह्याच्या बोंडगावदेवी येथील मानवता कनिष्ठ महाविद्यालयाची सावी उल्हास गाडगोणे ही देशातून ७४ वी आली आहे. इतर मागासगर्वीयातून देशात ती ११ वी आहे. तिला ७२० पैकी ६६० गुण मिळाले आहेत. सावीचे आई-वडील पेशाने अर्जुनी-मोरगाव येथे डॉक्टर आहेत. बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातच जायचे असा निश्चय केला. नियमित अभ्यासक्रमासोबतच नीटची जिद्द व परिश्रमपूर्वक तयारी केली. त्यामुळेच मला यश मिळाल्याचे ती सांगते. तिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. संस्थेचे सचिव यशवंत लंजे, प्राचार्य एन.एस. डोंगरवार यांनी तिचे कौतूक केले आहे.
सावी गाडेगोणे ‘नीट’ परीक्षेत देशात ७४ वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 10:07 PM