लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा रविवारी (दि.२४) घेण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी चे ७ हजार ४०३ तर इयत्ता ८ वीतील ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु गोंदिया तालुक्याच्या रावणवाडी केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास पेपर क्र.२ मिळाला नाही. त्यामुळे पेपर सुटण्याच्या वेळेवर या केंद्रावर दुसऱ्या पेपरला सुरूवात झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला होता.इयत्ता ५ वी करिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्ह्यातील ७२ शाळांमधील ७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यांच्यासाठी जिल्ह्याभरात ५८ केंद्र असून सडक-अर्जुनी तालुक्यात ८, अर्जुनी-मोरगाव ९, देवरी ४, तिरोडा ५, गोंदिया १६, गोरेगाव ४, आमगाव ७, सालेकसा येथे ५ केंद्र आहेत. तर इयत्ता ८ वीचे ३५१ शाळांमधून ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांच्यासाठी जिल्ह्याभरात ३९ परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ४, देवरी ४, तिरोडा ३, गोंदिया १३, गोरेगाव ३, आमगाव ४ व सालेकसा येथे ३ केंद्र होते. पेपर क्रमांक-१ मध्ये दुपारी १ ते २.३० वाजता दरम्यान भाषा व गणिताची परीक्षा घेण्यात आली. पेपर क्रमांक- २ दुपारी ३.३० ते ५ वाजतादरम्यान तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात येणार होता. या पेपरला रावणवाडी केंद्रावर ११९ विद्यार्थी हिंदी माध्यमाचे होते. त्या विद्यार्थ्यांच्या पेपरचा गठ्ठा काटी येथे नेण्यात आला. त्यामुळे या केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास उशीराने पेपर द्यावा लागला. सायंकाळी ५ वाजता दरम्यान पेपर सुटण्याची वेळ होती. परंतु ही वेळ निघून गेल्यावर ५ वाजतानंतर या केंद्रावर पेपर सुरू करण्यात आले. रावणवाडीचे पेपर काटीला गेल्यामुळे शिक्षण विभागाची बरीच तारांबळ उडाली होती.पेपर दुसºया केंद्रावर चुकीने गेल्यामुळे ते पेपर परत मागविण्यात आले. पेपरला दीड तास उशीर झाल्याने तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला.-लोकेश मोहबंशी, गटशिक्षणाधिकारी गोंदिया.
शिष्यवृत्तीचा पेपर दीड तास उशिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:30 PM
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि.२४) घेण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी चे ७ हजार ४०३ तर इयत्ता ८ वीतील ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु गोंदिया तालुक्याच्या रावणवाडी केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास पेपर क्र.२ मिळाला नाही.
ठळक मुद्देरावणवाडी केंद्रावरील घटना : पेपर काठीला गेल्याने ११९ विद्यार्थी बसले ताटकळत