लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विविध योजना राबवून व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र जि.प.शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जि.प.शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून धडे घ्यावे लागत असल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे आहे.तालुक्यापासून ३५ कि.मी. व जिल्हा मुख्यालयापासून ११० कि.मी.अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचायत भरनोली कार्य क्षेत्रातील राजोली जि.प.शाळा इमारतीची स्थिती अंत्यत बिकट आहे. या शाळेच्या इमारतीचे छत पूर्णपणे जीर्ण झाले आहे. स्लॅबचे पोपडे पडत असून यामुळे कधी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील ७ वर्ग खोल्यांपैकी मागील वर्षभरात ३ वर्गखोल्यांच्या स्लॅबचा पुष्टभाग गळून पडला आहे. सुदैवाने वर्ग सुरु असताना स्लॅबचा पृष्टभाग कोसळला नाही अन्यथा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अद्यापही जीर्ण वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. तर शिक्षण विभागाने सुध्दा याची दखल घेवून वर्ग खोल्यांचे बांधकाम केले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना धोका पत्कारुन धडे घ्यावे लागत आहे. लवकरच यासंदर्भात शालेय समितीची सभा घेवून पाठपुरावा करणार असल्याचे मुख्याध्यापक बिसेन यांनी सांगितले. शिक्षण विभागाने सदर तीन वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी डॉ.सुभाष गायकवाड, हेमराज डोंगरे, नामदेव लांजेवार व गावकऱ्यांनी केली आहे.शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्याची दुरुस्ती करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन पाठपुरावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल.- रामलाल मुंगणकर, पं.स.सदस्य.
नक्षलग्रस्त भागातील शाळा इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 9:50 PM
नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने विविध योजना राबवून व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र जि.प.शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे जि.प.शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून धडे घ्यावे लागत असल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात । शिक्षण विभागाचे दुर्लक्ष