लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही शिक्षकांमुळे जि.प.शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. शाळेत उशीरा येणे, गप्पा मारणे, दांडी मारणे या प्रकारामुळे येथील विद्यार्थी शाळेच्या वेळेतही इकडे-तिकडे भटकत असतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात शिकविले जावे, यासाठी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील १०६९ शाळांतील शिक्षकांवर वॉच ठेवण्यासाठी स्कुल मॉनिटरींग उपक्रम सुरू केला आहे.जिल्ह्यात डिजीटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, ज्ञानरचनावाद, वाचन कुटी, डिजीटल शाळा, वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहे. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहु नये, असा शिक्षण विभागाचा माणस आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.महाराष्टÑ विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धी करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित पातळी गाठू शकेल याचे नियोजन केले आहे.शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाशी संबंधित यशोगाथा त्यामध्ये केस स्टडीज, व्हिडिओज इत्यादी उल्लेखनीय बाबींचे मराठी व इंग्रजीमध्ये दस्ताऐवज भारत सरकारच्या एसएसए सौगन या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी योग्य पद्धतीने विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम आखून अपेक्षित अध्ययन संपादन पातळी साध्य करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण स्तरावरुन काम झाल्यास १०० टक्के मुलांना शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल. हा उद्देश आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळेवर शाळेत पोहचत नाही किंवा शाळा सुरू असतानाही आपले काम आटोपण्यासाठी शाळेच्या बाहेर अनेकदा जातात. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी ‘स्कुल मॉनिटरींग’ ही संकल्पना आणली.जिल्ह्यातील ८५ केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व स्वत: मुख्य कार्यपालन अधिकारी शाळांना अचनाक भेटी देऊन शिक्षक वेळेत उपस्थित झाले किंवा नाही याची पाहणी करीत आहे.वेळेवर हजर व्हा अन्यथा; घरी जा‘स्कुल मॉनिटरींग’ या उपक्रमात वेळेवर शाळेत न पोहचणाºया शिक्षकांना घरी पाठविले जाणार आहे. वेळेत शाळेत शिक्षक न आल्यामुळे विद्यार्थी इकडे-तिकडे भटकत असतात. ही बाब योग्य नसल्यामुळे ‘स्कुल मॉनिटरींग’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक शाळेत पोहचण्यापूर्वी अधिकारी शाळेत आले आणि वेळ निघून गेल्यावर शाळेत शिक्षक उशीरा आले तर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. त्या दिवसाचे वेतनही त्या शिक्षकाला मिळणार नाही.यशस्वी झाल्यास राज्यभरात अंमलगोंदिया जिल्हा परिषदेने शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सुरू केलेला ‘स्कुल मॉनिटरींग’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर या उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याला शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त भागात ही स्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वेळेच्या आत शाळेत उपस्थित राहिले पाहिजे यासाठी हा उपक्रम आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होईल.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी प्राथमिक, गोंदिया.
दांडी मारणाऱ्या शिक्षकांसाठी ‘स्कूल मॉनिटरिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:16 PM
जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही शिक्षकांमुळे जि.प.शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत आहे. शाळेत उशीरा येणे, गप्पा मारणे, दांडी मारणे या प्रकारामुळे येथील विद्यार्थी शाळेच्या वेळेतही इकडे-तिकडे भटकत असतात.
ठळक मुद्दे१०६९ शाळांवर वॉच : केंद्रप्रमुखासह सर्व अधिकाºयांच्या शाळांना भेटी