शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

समाजभवनच झाले त्या विद्यार्थ्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:02 AM

गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली.

ठळक मुद्दे गावातील युवकांनी स्वीकारली जबाबदारी : गराडा शाळा बंद प्रकरण, पालकांचा उपोषणाचा इशारा

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली. मात्र पालकांनी आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. या विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी गावातील एका सुशिक्षित बेरोजगार युवकांनी स्विकारली. त्यामुळे गराडा येथील समाजभवन विद्यार्थ्यांची शाळा झाल्याचे चित्र आहे.येथील शिक्षण विभागाने ३ जानेवारीला क्रांतोज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनीच कमी पटसंख्येचे कारण पुढे करीत गराडा येथील शाळा बंद केली. या विरोधात गावकरी व पालकांनी रोष व्यक्त केला. गावातील शाळा बंद करुन नये असा प्रस्ताव देखील गावकऱ्यांनी पारीत करुन जि.प.शिक्षण विभागाकडे पाठविला. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन शाळा बंद न करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने नियम पुढे करीत व वरुनच आदेश असल्याचे सांगत येथील शाळा बंद केली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणपासून वंचित राहण्याची वेळ आली. मात्र यानंतरही पालक डगमगले नाही.लहान मुलांना जंगलातून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या शाळेत पायी पाठवायचे कसे, त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार, यापेक्षा त्यांनी गावातील समाजभवनात शाळा सुरू केली. गावातील सुशिक्षित तरुणांनी त्यांना शिकविण्याची जबाबदारी स्विकारली.गराडा येथील शाळा बंद केल्याच्या विरोधात रोष व्यक्त केला. पण प्रशासनाला पाझर फुटला नाही. एक महिना वाट पाहून आता पालकांनी थेट शिक्षण मंत्र्यालाच पत्र पाठविले. गराडा येथील शाळा सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा या पत्रातून दिला आहे. प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार कायद्याला मुठमाती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद केली. त्या शाळेतील ११ विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे समयोजन केले. पण, गराडा ते मुंडीपार प्राथमिक शाळेचे अंतर ३ कि.मी. चे आहे. मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न पालकांना पडला. मुलांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. नाईलाजाने पालकांनी त्या चिमुकल्यांना शाळेतच न पाठविण्याचा पवित्रा घेतला.मागील एक महिन्यापासून गराडा येथील ११ चिमुकले शाळेचत गेली नाही. मुंडीपारच्या प्राथमिक शाळेत गराडा शाळेतील मुले येत नाही. ही बाब प्राशसनाला माहित आहे, पण प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचचले नाही.परीक्षेचे नियोजन कसे करणारगराडा प्राथमिक शाळा सध्या समाजभवनात भरते. गावातील एका सुशिक्षीत बेरोजगाराने त्या ११ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी गराडा ग्रामपंचायतीने त्या सुशिक्षीत बेरोजगार शिक्षकाला ५ हजार रुपये मानधन देण्याचे ठरविले आहे. मात्र तीन महिन्यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेचे नियोजन गराडाचे पालक कसे करतील. विद्यार्थी परीक्षा कसे देतील हा प्रश्न आता पालकांना सतावित आहे.पाल्यांसाठी पालकांची धडपडशिक्षण विभागाने कमी पटसंख्येचे कारण देत गराडा येथील शाळा बंद केली. महिनाभराचा कालावधी लोटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे पालकांनी आता शाळा सुरू करण्याच्या मागणीला घेवून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे आपले पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे प्रशासन केवळ हातावर हात ठेऊन आहे.