गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथे २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ वाजता आमगाव येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकूल यांच्या वाहनाला एका स्कॉर्पिनो धडक दिल्याने, डीवायएसपी यांच्या वाहनाचे २५ हजारांचे नुकसान झाले. डीवायएसपी जालिंदर नालकूल हे एमएच ३५ बी ५५२ या वाहनाने आपले शासकीय काम करण्यासाठी जात असताना, आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील आरोपी वाहन चालक मोसम अनिल शिंगाडे (२५) व प्रशांत शालीकराम भोयर (२५) दोन्ही रा.बोरकन्हार हे जात असताना, स्कॉर्पिओ एमएच ०६ एएस ००७० ने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचे २५ हजारांचे नुकसान झाले. सहायक फौजदार कृष्णकांत बाेडावार यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ४२७, सहकलम १८४,१८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
डीवायएसपीच्या वाहनाला स्कॉर्पिओची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:34 AM