लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि जि.प.शाळांमध्ये शुकशुकाट कायम होता.या संपात जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक सुध्दा सहभागी झाल्याने जि.प. शाळांना अघोषीत सुट्टी असल्याचे चित्र होते. या संपात ५३ संघटना व २५ हजारावर कर्मचारी सहभागी झाले आहे. संपात सहभागी विविध संघटनाच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. तर जिल्हास्तरावर गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.या संपात जवळपास सर्वच विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी खोळंबले होते. तर शिक्षक सुध्दा यात सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शुकशुकाट होता.बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कुठलाच तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप गुरूवारी (दि.९) कायम राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शिक्षकांनी केले रक्तदानराज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात मंगळवारपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. यात शिक्षक सहभागी झाले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी संपात सहभागी शिक्षक एल.यू.खोब्रागडे, मजर शेख, लिलाधर तिबुडे, लिलाराम जसुजा, संदीप मेश्राम, मनोजकुमार रोकडे, रवि खोडे, चंद्रकांत खोडे या शिक्षकांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना फटकाविविध शासकीय कामासाठी गोंदिया येथे येणाऱ्या नागरिकांना राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला. सर्व कर्मचारी संपावर असल्याने त्यांना आल्यापावलीच परत जावे लागले.
सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:58 PM
राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि जि.प.शाळांमध्ये शुकशुकाट कायम होता.
ठळक मुद्देकर्मचारी भूमिकेवर ठाम : शासनातर्फे वाटाघाटी सुरू