शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील २३ हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM

महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी २४ फेब्रुवारीला तर दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर। जिल्हा बँकेचे सर्वाधिक खातेदार, याद्या जाहीर करण्यास विलंब, ४८ तासात जमा होणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. २४ फेब्रुवारीला कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) रात्री उशिरा दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या समावेश आहे. पुढील ४८ तासांच्या कालावधीत या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.महात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तीन टप्प्यात जाहीर करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी २४ फेब्रुवारीला तर दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील एकूण २९ हजार ७५ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी पहिल्या यादीत १५६ आणि दुसऱ्या यादीत २३ हजार ३३७ शेतकऱ्यांचा समावेश असून उर्वरित ६ हजार शेतकऱ्यांची यादी मंगळवारपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकानी युध्द स्तरावर शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्डसह लिंक करुन त्यांचे अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले.त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेले सर्वाधिक १५ हजार २३० शेतकरी जिल्हा बँक तर राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या ८१०७ आहे.एकूण पात्र शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास जिल्हा बँकेचे १९ हजार १९१ आणि राष्ट्रीयकृत बँकेचे ९९६४ शेतकऱ्यांच्या समावेश आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीत पात्र उर्वरित शेतकऱ्यांचा समावेश असणार असल्याचे जिल्हा सहकार निबंधक के.पी.कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.आचारसंहितेबाबत संभ्रम ठरला कारणीभूतमहात्मा जोतिबा शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला सकाळी जाहीर करण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या कालावधी याद्या जाहीर झाल्यास आचारसंहितेचे उलघंन तर होणार नाही. असा तांत्रिक पेच निर्माण झाला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन शुक्रवारी रात्री उशिरा कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे खातेदार कर्जमाफीस पात्र ठरले,त्यांना या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले. त्यामुळे जिल्हा बँकेचे सर्वाधिक १५ हजार २३० शेतकऱ्यांचा पहिल्या व दुसऱ्या यादीत समावेश आहे.- राजेंद्र जैन, अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी