लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भातील सर्वच भागात हळूहळू स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या आजारामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या खासगी रूग्णालात उपचार घेत असलेल्या स्क्रब टायफसच्या दुसऱ्या रूग्णाचा शनिवार (दि.१५) रोजी मृत्यू झाला.अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथील सुप्रिया देवदास वट्टी (२३) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिला १३ सप्टेंबरला गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता तिला स्क्रब टायफसची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसातच म्हणजे १५ सप्टेंबर रोजी तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला. या आजाराची लागण झालेले दोन रुग्ण पुन्हा आढळले आहे.तपासणी दरम्यान आतापर्यंत एकूण ७ जणांना स्क्रब टायफसची लागण झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता सातवर पोहचली आहे. स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर आरोग्य प्रशासनाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.१२ सप्टेंबर रोजी सडक-अर्जुनी तालुक्यातील गिरोला येथील गुणाबाई रामचंद्र लंजे (३३), त्याच रूग्णालयात पुन्हा १४ सप्टेंबरला तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथील प्रमिला दशरथ गौतम (५२) यांनाही उपचारासाठी दाखल केले असता त्यांनाही स्क्रब टायफस असल्याचे तपासणीनंतर लक्षात आले. जिल्ह्यात आत्तापर्यंत स्क्रब टायफसचे एकूण सात रूग्ण आढळले असून यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.यापूर्वी अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या जानव्हा येथील सत्यभामा मेंढे (४५), बोंडगाव येथील तेजस्वीनी एम.हटवार (२०), सालेकसा तालुक्याच्या गोर्रे येथील कुवरलाल जी.बिसेन (४६) या तिघांना स्क्रब टायफस आजाराची लागण झाली होती.तर पोलीस पाटील सीमा यशवंत धुर्वे (३४) रा.थाडेझरी (कोसमतोंडी) ता. सडक-अर्जुनी यांचा स्क्रब टायफसने मृत्यू झाला आहे.काळजी घ्या!जिल्ह्यात हळूहळू स्क्रब टायफस आजार पाय पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून या आजाराची लक्षणे दिसतात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घ्यावा. स्क्रब टायफसचा आजार पसरत असल्यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी कळविले आहे.अशा करा उपाययोजनाघराभोवती असलेले शेणांचे उकंडे, कचºयाचे ढिगारे त्वरीत नष्ट करा, माईट नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर करा, शेतात काम करीत असताना संपूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करा, किटकनाशक औषधांचा वापर करा, खुल्या जागेवर शौचास जाणे टाळा, स्क्रब टायफसचे रुग्ण आढळलेला परिसरातील झाडे झुडपे नष्ट करा, पालापाचोळा जाळून टाका, आपला परिसर स्वच्छ ठेवा.चार तालुक्यात स्क्रब टायफसचे रुग्णजिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, तिरोडा या चार तालुक्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले आहेत. या गावात साथरोग अधिकारी डॉ.बी.आर.पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी भेट देवून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबाबत गावकºयांना मार्गदर्शन केले.
स्क्रब टायफसचा जिल्ह्यात दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:05 PM
विदर्भातील सर्वच भागात हळूहळू स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या आजारामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या खासगी रूग्णालात उपचार घेत असलेल्या स्क्रब टायफसच्या दुसऱ्या रूग्णाचा शनिवार (दि.१५) रोजी मृत्यू झाला.
ठळक मुद्देरुग्णांची संख्या ७ वर : नागरिकांना दक्षतेचा इशारा