गोंदिया : येथील प्रताप चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने येत्या शुक्रवारी (दि.१५) रामनवमीला तालुक्यातील ग्राम सतोना येथे सायंकाळी ६ वाजता सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ््यात परिणयबद्ध होणाऱ्या जोडप्याला राज्य शासनाच्या शुभमंगल योजनेंतर्गत १० हजार रूपये प्रतीयुगल अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधुपिता शेतकरी किंवा शेतमजूर असणे आवश्यक असून ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. सोबतच पालकांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रूपयांपेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यात वर किंवा वधू एससी/एसटी असणे आवश्यक असून अशा जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रूपये अतिरीक्त अनुदान दिले जाईल. तसेच ट्रस्टकडून भांड्यांचा सेट, सुटकेस व पंखा भेट दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सामूहिक विवाह समिती संयोजक सदस्य देवेंद्र मानकर, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, अनिल मते यांच्याशी संपर्क करता येईल. (शहर प्रतिनिधी)
सतोना येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा
By admin | Published: April 11, 2016 2:00 AM