लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील भोसा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. यातंर्गत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या ७ हजार बिया गोळा करुन सीड बँक तयार केली आहे. तसेच हे बियाणे पावसाळ्यापर्यंत सुरक्षीत राहावे यासाठी सर्व बियाणे मातीचे गोळे तयार करुन त्यात ठेवले.सिंमेटच्या वाढत्या जंगलामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ºहास होत आहे.पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शासनातर्फे शतकोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. तसेच वृक्षारोपण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. याच आवाहनाला साद देत भोसा येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात आणि गावाशेजारी परिसरात फिरून विविध प्रजातीच्या वृक्षांचे ७ हजार बिया गोळा केले.गोळा केलेल्या बियांना कीड लागू नये यासाठी या बिया मातीचे गोळे करुन त्यात सुरक्षीत ठेवण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर गावातील रस्त्याच्या दुतर्फा आणि पांगोली घाट परिसरात या बियांचे रोपण करण्यात येणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. या उपक्रमात शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक ए.एस.रावते, सहाय्यक शिक्षक संजय धुर्वे, जैपाल ठाकूर, एच.एम रहांगडाले, डी. टी. गिर्हेपुंजे व एन. एच. कटरे यांनी सहकार्य केले.
भोसा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केली सीड बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 9:22 PM
तालुक्यातील भोसा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. यातंर्गत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या ७ हजार बिया गोळा करुन सीड बँक तयार केली आहे.
ठळक मुद्दे७ हजार बिया केल्या गोळा : पावसाळ्यात करणार रोपण