कार्यकारिणीत, उपाध्यक्षपदी एस. एस. गर्ल्स काॅलेजमधील डॉ. दीशा गेडाम, सचिव जी.ई.एस.कनिष्ठ महाविद्यालयातील (मोहाडी) प्रा. जागेश्वर भेंडारकर, सहसचिव प्रा. सेवकराम भगत, कोषाध्यक्ष प्रा. जगदिश खेडकर तर सदस्यांत प्रा. खिलेश पारधी, प्रा.धनंजय गहाणे, प्रा.धम्मपाल गजभिये, प्रा. माधुरी सावळे, प्रा. शालिनी पटले व प्रा. प्रेमप्रकाश हनवते यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन शिक्षकांची तालुका प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. गोंदिया तालुक्यातून प्रा. प्रकाश मेहर व प्रा. मनोज बर्वे, गोरेगाव प्रा. मोरेश्वर पटले व प्रा. देव तितीरमारे, सडक-अर्जुनी प्रा. विलास झोडे व प्रा.शुभांगी मेश्राम,अर्जुनी-मोरगाव प्रा. गिरीश बोरकर व प्रा.राजेन्द्र लंजे, देवरी प्रा. भोजराज दोनोडे व प्रा. नरेश पटले, तिरोडा प्रा. दीपाली पी. चौधरी व प्रा. अर्चना आर. सोनवाणे, आमगाव प्रा. रत्नदीप खोब्रागडे तर सालेकसा तालुक्यातून प्रा. नंदलाल भोयर यांचा समावेश आहे.
मराठी विषय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:14 AM