महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर बुधवारी (दि.१८) शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा हायस्कूलमधील सौरव लेकचंद बडोले, विशाखा लेखराम मुनिश्वर, वैशाली रामदास पुसाम आणि अवेश जवाहरलाल शहारे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सलग ४ वर्षे प्रती वर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम, केंद्रप्रमुख जी. जे. कापगते, शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगांबर कोरे, उपाध्यक्ष अंजूम आरिफ खान, वर्ग शिक्षक डब्ल्यू. एम. परशुरामकर, शिक्षक डी. पी. डोंगरवार, एस. सी. फुंडे, आर. जी. पुस्तोडे, एन आर गिरेपुंजे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांना दिले आहे.
चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीकरिता निवड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:33 AM