आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा मध्यवर्ती बँकांनी १०० सेवा सहकारी संस्थांना नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी भाग भांडवल उपलब्ध करु न दयावे. शेतमाल तारण योजनेबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक महसूल गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुरु कराव्यात. त्यासाठी शासनस्तरावर विदर्भासाठी नोंदणीचे निकष शिथील करण्यात येतील असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोरगाव येथे सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार भैरिसंह नागपूरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, विभागीय सहनिबंधक प्रविण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी अतुल नेरकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश टेटे, तालुका निबंधक,सहकारी संस्थेचे सर्व सचिव, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक उपस्थित होते.देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. त्यामुळे सहकारी संस्था सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल. ज्या संस्थांची अटल पणन अभियानाअंतर्गत निवड करण्यात आली आहे. त्या संस्था योग्यरित्या कार्यान्वीत होण्यासाठी सर्व अधिकाºयांनी कार्यवाही करावी. शासकीय अनुदानापेक्षा योगदानातून सहकार वृध्दींगत करावा. कर्जमाफी अंतर्गत लाभार्थ्यांना बेबाक प्रमाणपत्र देवून शेतकºयांचा सातबारा बँकांनी कोरा करा. याकडे संबंधित बँकांच्या अधिकाºयांनी विशेष लक्ष दयावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.निर्णयाची प्रभावी अमलबजावणी करासावकारी अधिनियम २०१४ याबाबतचा आढावा घेवून देशमुख म्हणाले, जिल्ह्यात सर्व बँका मिळून आतापर्यंत ४८ हजार ४९ पात्र शेतकºयांना १३२ कोटी ५५ लाख रु पयांचा लाभ दिला आहे. पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत या योजनेची कार्यवाही सुरु च राहणार आहे. मंजूर कर्ज खात्यावर बँकांनी कुठलेही अतिरिक्त व्याज आकारु नये. राज्यस्तरीय बँकर्सच्या सभेत घेतलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करण्यास सांगितले.जिल्ह्याचा महाराईस ब्रँड तयार करापूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. अटल महापणन अभियानाअंतर्गत या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये एकच महाराईस ब्रँड उत्पादीत करा. त्याचे विपणन मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासह मोठ्या शहरातील मध्यवर्ती सहकारी ग्राहक भंडारमार्फत करण्यात यावे. अशी सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकाºयांना केली.
प्रत्येक महसुली गावात सेवा सहकारी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:43 PM
जिल्हा मध्यवर्ती बँकांनी १०० सेवा सहकारी संस्थांना नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी भाग भांडवल उपलब्ध करु न दयावे. शेतमाल तारण योजनेबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी जास्तीत जास्त जनजागृती करुन ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. प्रत्येक महसूल गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुरु कराव्यात.
ठळक मुद्देसुभाष देशमुख : सहकार विभागाची आढावा बैठक