शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

By नरेश रहिले | Published: April 30, 2023 8:26 PM

या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

नरेश रहिलेगोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि. ३०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत १० हजार आठ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

वर्षांनुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.व्ही. पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोड पात्र न्यायप्रविष्ट व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणाकरिता विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी.के. बडे यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी केले. त्यांनी लोकअदालतीचे फायदे व महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तडजोडीने प्रकरण निकाली काढण्याकरिता येथील जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. खान, जिल्हा न्यायाधीश- २ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.डी. खोसे, तदर्थ न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.बी. लवटे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) आर.एस. कानडे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.व्ही. कुलकर्णी, कामगार न्यायाधीश वाय.आर. मुक्कणवार, जिल्हा तकार निवारण आयोग अध्यक्ष बी.बी. योगी, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.आर. मोकाशी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही.ए. अवघडे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.एन. ढाणे, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम.बी. कुडते, चाैथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाय.जे. तांबोली, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.डी. वाघमारे, सहावे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर टी.व्ही. गवई, गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी.के. बडे, उपाध्यक्ष ॲड. आरती भगत, सचिव एस.आर. बोरकर, पॅनलवरील वकील ॲड. दयाल कटीयार, शुभम रामटेके, माया उपराडे, राखी पटले, शिल्पा सोनी, रेखा खोबागडे, गोंदिया यांनी सहकार्य केले. आयोजनासाठी प्रबंधक आर.जी. बोरीकर, अधीक्षक पी.पी. पांडे, एम.पी. पटले, ए.एम. गजापुरे, सचिन एम. कठाणे, पी.एन. गजभिये, एस.डी. गेडाम, प्रीती जेंगठे, बी.डब्ल्यू. पारधी, यू.पी. शहारे, जगदिश पटले, रीना ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.

चार कोटी १४ लाखांची केली वसुली

 जिल्ह्यातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी ४१४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढून एक कोटी २३ लाख ८४ हजार ३३१ रुपये वसूल करण्यात आले. न्यायालयात प्रलंबित ८५५ फौजदारी प्रकरणांपैकी ८५५ प्रकरणे निकाली काढून एक कोटी ३९ लाख ५८ हजार १६६ रुपये वसूल करण्यात आले. पूर्वन्यायप्रविष्ट २५ हजार २९ प्रकरणांपैकी नऊ हजार ११७ प्रकरणे निकाली काढून एक कोटी ५१ लाख दाेन हजार ४९७ रुपयांची वसुली केली. एकूण ठेवलेल्या प्रकरणांपैकी १० हजार आठ प्रकरणे निकाली काढून एकूण चार कोटी १४ लाख ४४ हजार ९९४ रुपयांची वसुली झाली. 

स्पेशल ड्राइव्हची ३८४ प्रकरणे निकाली या लोकअदालतीत स्पेशल ड्राइव्हअंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये ४८८ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन, बँक रिकव्हरी यांचे पूर्वन्यायप्रविष्ट प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.

टॅग्स :Courtन्यायालयgondiya-acगोंदिया