शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोयलारी (शेंडा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मासीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील आलेल्या चार तंट्यापैकी तिन तंट्याचा निपटारा समोपचाराने करण्यात आला. यामध्ये वादी प्रतिवादीने समितीने दिलेल्या निर्णयाचा नि:संकोच स्वीकार केला. सतत सात वर्षापासून या गावात दीनदयाल पाथोडे यांची सर्वानुमते अध्यक्षपदासाठी निवड केली जाते. प्रत्येक महिन्याला मासिक सभेचे आयोजन करणारे तालुक्यातील पहिले गाव आहे. त्याचप्रमाणे मासिक सभेला १०० टक्के सभासदांची उपस्थिती असते. या गावातील समितीने गावहिताचे अनेक उपक्रम राबवून उच्चांक गाठला. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समिती सज्ज आहे. आजपावेतो शेकडो तंट्याचे निपटारे करून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वतोपरी घेतली जाते. त्यामुळे गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस स्टेशनकडे न जाता गावातच समितीच्या सहकार्याने सोडविले जातात. या मासिक सभेला अध्यक्ष दीनदयाल पाथोडे, पोलीस पाटील नरेश राऊत, सरपंच हिरालाल मेश्राम, शिक्षक कोरे, वनरक्षक बिसेन, नीताराम तरोणे, राजेश शहारे, सुनीता इळपाते, वच्छला गहाणे, चिंतामण गहाणे, माधोराव कापगते, दिलीप उईके, ललित बडोले, भाऊलाल वालदे व इतर नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
तंमुसने केला तंट्याचा निपटारा
By admin | Published: June 28, 2014 11:38 PM