रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवणी टोला चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस शिपाई हितेश लांजेवार यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.? दुसरी कारवाई शिवणी चौक येथे ९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली. आरोपीवर भादंविच्या कलम १८८, सह कलम ५१(ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.? तिसरी कारवाई रावणवाडीच्या त्रिमुर्ती चौकात ९ मे रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. पोलीस शिपाई रूपेंद्र गौतम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.? चवथी कारवाई चंगेरा येथील आहे.? ९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.? पाचवी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा नाका गोंदिया येथील आहे.? ५ आरोपी हे विनाकारण फिरत असल्यामुळे पोलीस हवालदार राजेश भुरे यांनी केली आहे.? ही कारवाई गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकात करण्यात आली. सातवी कारवाई रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शक्ती चौक गोंदिया येथे करण्यात आली. चार आरोपी हे विनाकारण फिरत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९, सह कलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सह कलम ११ महाराष्ट्र कोविड विनियम २०२० अन्वये गुन्हा नोंद केला आहे.?
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर सात गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:30 AM