शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

गोंडमोहाळीचे सात सदस्य अपात्र

By admin | Published: April 14, 2016 2:23 AM

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले.

हिशेबातील दिरंगाईचा फटका : जिल्हा प्रशासनाचे आदेशपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले. सर्व सदस्यांना आदेशाची प्रतही पाठविली.मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (१) ह अन्वये गोंडमोहाळी ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक दि.२५/७/१५ रोजी झाली होती. दि.२७/७/१५ रोजी मतमोजणी करण्यात आली. दि.७/८/१५ ला सरपंच-उपसरपंचाची निवड झाली. यात पौर्णिमा सदनलाल वाडगाये सरपंचपदी व उपसरपंचपदी सुभाष बाबुराव कावडे यांची निवड झाली. पण सत्तेच्या गुर्मीत हिशेब देणे विसरले. ग्राम अधिनियम १९५८ कलम १४ व नुसार खर्चाचा हिशेब देणे अनिवार्य आहे. मात्र या सदस्यांनी ४५ दिवस होऊनही निवडणुकीचा हिशेब दिला नाही. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदस्य जागेश्वर निमजे आणि इतर चार लोकांनी सरपंच पौर्णिमा वडगाये, उपसरपंच सुभाष कावडे, पुष्पा बोपचे, ममता बोपचे, प्रभा राऊत, धनवंता भगत, भूमेश्वर शेंडे यांच्याविरूद्ध याचिका अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात दि.१०/८/१५ ला दाखल करण्यात आली होती. निकाल लागल्यानंतर ३० दिवसाच्या आत हिशेब देणे महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागाचे शासन परीपत्रक दि.२९/३०२०१२ अन्वये बंधनकारक असताना त्यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. या सदस्यांनी दि.४/९/१५ रोजी हिशोब सादर केले. तहसीलदार तिरोडा यांच्याक्ून वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात आला. यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद वकीलामार्फत पाठविण्यात आला. दोन्ही पक्षाचे तोंडी, लेखी बमाल नोंदविण्यात आले. पण गैरअर्जदार ठोस पुरावे सादर करू शकले नाही. गैरअर्जदाराची अपील खारिज अमान्य करण्यात आली. सरपंच, उपसरपंच पाच सदस्यांना सात महिन्यातच पायउतार व्हावे लागले. दुसरी याचिका सुद्धा अतिक्रमणाची टाकण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ता जागेश्वर निमजे यांनी लोकमतला सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार गावातील नागरिकांनी हे प्रकरण घडण्यामागचे सत्य वस्तुस्थिती जाणऊन घेण्यासाठी ज्याला काही घेणेदेणे नाही त्यांना चर्चेदरम्यान विचारले असता त्या नागरिकांनी सांगितले की, गावाच्या राजकारणात बाहेवरील माणुस हस्तक्षेप जास्त करीत आहे. गावात सामाजिक भावना न ठेवता, विकासाची बाजु न मांडता बदल्याची भावना ठेऊन काम करीत आहे. त्यांना कामाची जाणीव नाही, सत्तापक्षाला चुकीचे मार्गदर्शन करणे हेच अंगावर आले व विरूद्ध पार्टीचे लोक नियमाचे भान ठेऊन कार्य करीत असल्याने सत्तापक्षाला अडकवत आहेत. पण आपले नाव लिहू नये या अटीवर त्यांनी गावांची आपबीती सांगितली. लोकमतने अगोदर हे प्रकरण उचलून धरले व त्यांना न्याय ही मिळाला.