लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणाचे ४, कालीसरार धरणाचे १ आणि धापेवाडा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे. बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे.रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे तिरोडा, सडक अर्जुनी व गोरगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक नाल्यावरील पुलावरुन एक ते दीड फुट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील खासगी शाळांनी सुटी जाहीर केली. या पावसाचा नागरिकांच्या दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता. तर पावसामुळे रोवणीची कामे सुध्दा पूर्णपणे ठप्प झाले होती.तीन दिवसाच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ३५३ घरे ७५ गोठ्यांची पडझड झाली. त्यामुळे याचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. संततधार पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केलेली रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन दिवसाच्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दात समाधानकारक वाढ झाली आहे. मागील तीन चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय ओव्हर फ्लो झाले. जिल्ह्यातील प्रमुख धरणाच्या पाणीसाठ्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे याची उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि शेतकºयांना सिंचनासाठी मदत होणार आहे.दरम्यान बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या दिवशी सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला.२० टक्के विद्यार्थी परीक्षेपासून वंचित२८ आॅगस्टपासून पायाभूत चाचणी घेण्यात सुरुवात झाली आहे. परंतु मंगळवारी(दि.२८) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जवळपास २० टक्के विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. मंगळवारच्या पेपरला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा चाचणी देण्याची संधी मिळावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
सात महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:18 AM
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील चौवीस तासात ३३ पैकी ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून ३६.६१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात तीन दिवसांच्या पावसाने नदी नाले तुडुंब : धरणाचे दरवाजे उघडले, घरांची पडझड