दंड वसूल : महसूल विभागाची पहाटेची कारवाईतिरोडा : अवैधरित्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरुन नेणारे, विटा नेणारे, मुरुम नेणारे असे आठ ट्रॅक्टर १४ आॅक्टोबरला पहाटे ३ वाजताच्या दरम्यान पकडून त्यांचेकडून १ लाख तीन हजार रुपये दंड महसूल विभागाने वसूल केला.प्राप्त माहितीनुसार, अवैध रेती वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर मालकाकडून ४६२०० रुपये, ३ ट्रॅक्टर मुरुम वाहून नेणारे ट्रॅक्टर मालकाकडून ३१२०० रुपये व २ ट्रॅक्टर अवैध विटा वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक यांचेकडून २५६०० रुपये असे एकूण १ लाख ३००० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान संबंधितांकडे रॉयल्टी असतानाही कारवाई झाल्याची तक्रार ट्रॅक्टरमालकांनी केली आहे.या कारवाई तहसीलदार रविंद्र चव्हाण, नायब तहसीलदार सतीश मासाळ, तलाठी आर.आर. भीवगडे करटी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.मध्यप्रदेशातून दररोज ५०-६० ट्रॅक्टर अवैधरित्या विटा येत असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुरुम हे वनविभाग व तालुका प्रशासनाच्या जागेतून जेसीबी ने काढून संबंधितांशी संगनमत करुन अवैधरित्या वाहतूक केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेतीचे आठ ट्रॅक्टर जप्त
By admin | Published: October 16, 2016 12:24 AM