गोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण पालखी काढून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. मुंडीपार : नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी जि.प. केंद्रिय वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे सर्व शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थित मिरवणुकीच्या माध्यमातून गावात शिक्षण पालखी काढण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाचे प्राचार्य प्रशांत डवरे यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी शिक्षण पालखीत सहभागी होवून मार्गदर्शन केले.यानंतर शाळेत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पारस शेंडे होते. अतिथी म्हणून प्राचार्य प्रशांत डवरे, मुख्याध्यापक वाय.बी. पटले, शिलवंत जांभूळकर, होलराज बिसेन, भेमश्वरी ठाकूर, सुनिता पटले, सविता भगत व रमेश वाघाडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वर्ग १ ते ७ च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एच.डी. चौधरी यांनी तर आभार एन.बी. कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.दासगाव : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचे नाव इतिहासात अजरामर राहील, असे प्रतिपादन कालिदास सूर्यवंशी यांनी शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमात संत कबीर हायस्कूल, शिवनी येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एच.जी. मेश्राम होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेच्या पूजन झाली. अध्यक्षांनी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा व कार्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे संचालन डी.जी. मेश्राम तर आभार विनोद मोटघरे यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.दासगाव : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्योधन गजभिये होते. यावेळी शाहू महाराजांच्या जीवनावर मनोहर तिरपुडे, मिलिंद गजभिये, आनंद मेश्राम, नानाजी वासनिक, भावीकदास मेश्राम, किरण मेश्राम, पुरुषोत्तम मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र मेश्राम तर आभार तिरपुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ओमप्रकाश पटले, दिनेश ढबाले. अनिल मेश्राम, राहुल मेश्राम, मंगेश खांडेकर यांनी सहाकार्य केले.
शाहू महाराज जयंती व शिक्षण पालखी
By admin | Published: June 29, 2014 11:59 PM