लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील शंभुटोला ते माल्ही या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ता बांधकामाची संबंधित विभागाने चौकशी करुन कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर बांधकामात कंत्राटदार आणि सा.बां.चे अभियंता यांचे साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात गावकºयांनी कंत्राटदार, अभियंत्याला जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीतून केला आहे. या रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.यासंबंधिचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिले. शिष्टमंडळात होलीराम शिवणकर, रामप्रसाद पारधी, गजानन शेंडे, दिनेश शेंडे, बलीराम फुंडे, योगेश शिवणकर, घनश्याम मेेंढे, ज्वालाप्रसाद पारधी, चंद्रभान शेंडे, प्रमोद लिल्हारे, संदीप लिल्हारे यांचा समावेश आहे.
शंभूटोला ते माल्ही रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 5:00 AM
आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देबांधकामाची चौकशी करुन कार्यवाही करा : गावकऱ्यांची मागणी