शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

शंभूटोला वाघ नदीतून अवैध रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 9:38 PM

वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली असून आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला आहे. मागील महिनाभरापासून रात्रंदिवस ही रेती चोरी होत आहे. परंतु रेती माफीयांशी आमगावच्या महसूल विभागातील काही अधिकाºयांशी संगणमत असल्याची जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे मौन : तरूणांच्या तक्रारीकडे महिनाभरापासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वाघनदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला गेली असून आमगाव येथील तहसीलदार व त्यांची चमू या रेती चोरीकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शंभूटोला येथील गावकऱ्यांनी केला आहे. मागील महिनाभरापासून रात्रंदिवस ही रेती चोरी होत आहे. परंतु रेती माफीयांशी आमगावच्या महसूल विभागातील काही अधिकाºयांशी संगणमत असल्याची जोरदार चर्चा आहे.न्यायालयाने घाट लिलाव करण्याची परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्यातील एकही घाटाचा लिलाव झाला नाही.मात्र रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. आमगाव तालुका वगळता सातही तालुक्यात रेती चोरी संदर्भात काहीना काही कारवाई होत असल्याचे चित्र आहे. मात्र मागील दोन वर्ष रेती चोरांवर अंकुश लावणारा आमगावचा महसूल विभाग यंदा रेती माफीयांवर मेहरबान का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आमगाव तालुक्यातून वाहून जाणाºया वाघ नदीची रेती मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. महसूल विभाग व रेती माफीया यांच्यात ताळमेळ बसल्यामुळे रेती चोरांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. मागील महिनाभरापासून शंभूटोला येथील वाघनदीच्या घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे. दररोज जवळपास ५० ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. या घाटातून ५०० ते १००० ब्रास रेतीचा उपसा करून दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक होत असली तरी महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गोंदिया, सडक-अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्याने रेती चोरांवर अंकुश ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु आमगाव येथील महसूल विभागाने या रेती माफीयांना अभयदान देऊन त्यांच्यावर करणाºया कारवाईकडे दुर्लक्ष केले.आमगाव तालुक्यातील बहुतांश घाटांची हीच स्थिती आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी शंभूटोला येथील उपसरपंच होलीराम शिवणकर, देवेंद्र लिल्हारे, श्रीकांत शिवणकर, महेंद्र पाथोडे, मितेश शिवणकर, सचिन मेंढे, हुकूमचंद शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य ललीता शिवणकर, ओमकार शिवणकर व गावकºयांनी केली आहे.तहसीलदाराला दाखविला व्हिडिओ व फोटोशंभूटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला जात असताना महसूल विभाग काहीच कारवाई करीत नसल्याचे पाहून गावातील शेकडो तरूणांनी एकत्र येऊन त्या ट्रॅक्टर चालकांना पकडले. परंतु त्यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी आले नाहीत. त्यामुळे त्या माफीयांना रेती घेऊन सहज जाता आले. आता रेती माफीयांचा एवढा जोर वाढला की ते गावकºयांना न जुमानता रेतीची सर्रास वाहतूक करीत आहेत. यासंदर्भात तरूणांनी काढलेल्या फोटो व तयार केलेल्या व्हिडिओ तहसीलदार साहेबराव राठोड यांना दाखविला.आता त्या रेती माफीयांवर काय कारवाई होते याकडे तरूणांचे लक्ष लागले आहे.रेती चोरीचा यंदा एकही दंड नाहीआमगाव तहसील कार्यालयाने मागील दोन वर्षात रेती चोरांवर वचक ठेवून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला होता. दंड वसूल करण्यात आमगाव तालुका जिल्ह्यात आघाडीवर होता. परंतु यंदा एकही रेती चोराला १ लाख १५ हजाराचा दंड केला नाही. याचाच अर्थ कुठे तरी पाणी मूरत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.