तिरोडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना दुसरा रेतीघाट उपलब्ध करून द्या, धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे तातडीने द्या व त्या विहिरीला वीजजोडणी करा, करंट लागून ज्या शेतकऱ्यांचे जनावर मरण पावले त्यांना तातडीने आर्थिक मोबदला द्या, तिरोडा शहरातील महात्मा फुले वॉर्डातील रहिवाशांना घरकुल लाभ व जमिनीचे पट्टे द्या, शहरातील ई-रिक्षाचालकांसाठी ई-रिक्षा स्टॅन्डकरिता जागा उपलब्ध करून द्या, घरकुलाच्या प्रपत्र 'ड' मध्ये ग्रामपंचायत मागणीनुसार सुटलेली नावे ऑनलाईन करा, नरेगाअंर्तगत ग्रामपंचायत स्तरावरील कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अंदाजपत्रक मागणीनुसार ८ दिवसांत तयार करुन द्या व मस्टर लवकरात लवकर काढा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
सर्व नागरिक, शेतकरीबांधव व घरकुल लाभार्थ्यांनी धडक मोर्चा व मुंडन आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे,असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर व तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी कळविले आहे.