कोरोनाचे नियम पाळून येथील शिवसेना शाखेच्या वतीने शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ३०० नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे, सरपंच नंदू पाटील गहाणे, उपसरपंच रामकृष्ण बनकर, तेजुकला गहाणे, अर्चना राऊत, भारती दहीकार, प्राचार्य नरेंद्र काडगाये, डॉ. पिंकू मंडल, योगेश नाकाडे, श्रीकांत घाटबांधे, अरुण मस्के, मनोहरपंत ढोमणे, शिवसेना संघटक मंत्री चेतन दहीकार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी अभिजित मशिद, सुशील गहाणे, कैलास चुन्ने, ज्ञानदेव कापगते, डुुलेश्वर सोनवाने, लिलाधर ठाकरे, विनोद भजने, अनिल मानकर, सुधाकर बोरकर, नाना शेंडे, लोकेश शेंडे, समीर मानकर यांनी सहकार्य केले.
केशोरी येथे शिवजयंती साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:30 AM