खातीया : बिरसी येथे १८ फेब्रुवारीपासून शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वीर चिमणाबहादूर आणि शिवजयंती यानिमित्त कुणबी समाजाच्या वतीने दि.१८ रोजी सकाळी ११ वाजेपासून कार्यक्रमांचना सुरूवात होमार आहे. उद्घाटन माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपा महिला आघाडी सचिव सीता रहांगडाले, भाजपा गोंदिया तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, गोंदिया तालुका शिवसेना अध्यक्ष मुन्ना बहेकार राहणार आहे. दुपारी १ वाजेपासून महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयन्स क्लब अध्यक्ष सुनिता बहेकारच्या हस्ते, बहेकार व्यसनमुक्ती केंद्राच्या कल्पना बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी ३ वाजेपासून ५ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळा घेण्यात येईल. यामध्ये उद्घाटक म्हणून कामठा लहन्री आश्रम अध्यक्ष गोपाल खरखाटे उपस्थित राहतील. तर करउपायुक्त धनंजय वंजारी यांचा सत्कार शिक्षक धनीराम तावाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विजय लोणारे, कुंदन कटारे आदी उपस्थित राहणार आहेत. दि.१९ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजतापासून रॅलीला सुरूवात होईल. या रॅलीचे उद्घाटन लहरी बाबा आश्रमचे संचालक तुकड्या बाबा खरखाटेच्या वतीने भाऊलाल तरोणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून खातीयाचे माजी सरपंच हिमांशू बहेकार, नरेश चौधरी आदी राहीतील. ४ वाजचापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिम स्थळाचे भूमिपूजन खा.नाना पटोले यांच्या हस्ते, विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येईल. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोविंद शेंडे, रमेश कुथे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमुळे उत्साहाचे वातावरण आहे.
शिवजयंती कार्यक्रम आजपासून
By admin | Published: February 18, 2017 1:06 AM